मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने 14 जून रोजी आत्महत्या केली होती. 6 महिन्यांचा कालावधी उलटून गेला असूनही सुशांतला चाहते अजून विसरलेले नाहीत. दरम्यान सुशांतचे वडील रूग्णालयात दाखल आहेत.
नुकतंच सुशांतच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्ताप्रमाणे, हृदयाच्या आजारामुळे ग्रस्त असल्याने त्यांना रूग्णालयात भरती करण्यात आलंय. सुशांतच्या वडिलांचा रुग्णालयातील एक फोटो सध्या व्हायरल झालाय. या फोटोमध्ये के.के सिंग यांच्यासोबत सुशांतच्या बहिणी प्रियंका आणि मितू सिंग दिसतायत.
View this post on Instagram
दरम्यान सुशांतच्या वडिलांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. सुशांतचे चाहते ते लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना करतायत.
थोडक्यात बातम्या-
मुंबईकरांनी खूप भोगलंय, आणखी त्रास नको; फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना जोडले हात!
राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान
माझ्या मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी अहंकारी आहे- उद्धव ठाकरे
सातारच्या पाटलानं पटवली ‘कश्मीर की कली’; ‘हा’ अडथळा दूर होताच उडवला बार!
शिवसेनेसारखी कामं आपल्याला करायची नाहीत- चंद्रकांत पाटील