बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बॉलिवूडला उद्ध्वस्त करण्यासाठी सुशांतचं ब्रम्हास्त्रच पुरेसं”

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूपासूनच बॉलिवूडला ग्रहण लागल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत असतात. एका पाठोपाठ एक बॉलिवूडचे अनेक बिग बजेट चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटत आहेत.

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टचा ब्रम्हास्त्र चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटावर संमिश्र प्रतिक्रिया येत असताना सुशांतची बहिण मीतू सिंगने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत बॉलिवूडवर टिकास्त्र डागलं आहे.

या बॉलिवूडला उद्ध्वस्त करण्यासाठी सुशांतचे ब्रह्मास्त्र पुरेसे आहे. बॉलीवूडला नेहमीच जनतेला हुकूम द्यायचा असतो, परस्पर आदर आणि नम्रता दाखवण्यासाठी कधीही थांबत नाही, अशी टीका सुशांतच्या बहिणीने केली आहे.

दरम्यान, अशा लोकांना आपण नैतिक मूल्यांनी समृद्ध असलेल्या आपल्या देशाचा चेहरा कसा होऊ देऊ शकतो? जनतेचे प्रेम जिंकण्याचा त्यांचा खेदजनक प्रयत्न फसला आहे. गुणवत्ता आणि नैतिक मूल्ये ही एकमेव गोष्ट आहे जी प्रशंसा आणि आदर मिळवेल, असंही मीतू सिंह म्हणाली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Meetu Singh (@divinemitz)

थोडक्यात बातम्या-

‘सगळे सिनेमे सारखेच’, ब्रम्हास्त्र प्रदर्शित होताच ऋषी कपूर यांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

MBA चहावाल्यानंतर Post Graduate चहावालीची सगळीकडेच चर्चा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More