मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचा विषय देशभरात गाजला होता. सुशांतची हत्या झाल्याचं देखील अनेकांकडून सांगण्यात येत होतं. यानंतर सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात आली होती.
यासंदर्भात आता महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाष्य केलंय. सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली हे सीबीआयने स्पष्ट करावं असं गृहमंत्र्यांनी सांगितलंय.
अनिल देशमुख म्हणाले, “सुशांतच्या मृत्यूची चौकशी सुरु करून सीबीआयला जवळपास पाच महिने झालेत. मात्र अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची हत्या झाली की, त्याने आत्महत्या केली, याचा सीबीआयने अजून काहीही स्पष्ट केलेलं नाहीये. मी सीबीआयला विनंती करतो की, त्यांनी लवकरात लवकर चौकशीचे निष्कर्ष जाहीर करावे.”
सुशांतच्या आत्महत्येचा तपास प्रथम मुंबई पोलिसांकडून केला जात होता. मात्र त्यानंतर तो सीबीआयकडे सोपवण्यात आला. मात्र, यावर सीबीआयकडून कोणतंही भाष्य केलेलं नाहीये.
थोडक्यात बातम्या-
गॅस दर कमी केले नाही तर….; रूपाली चाकणकर आक्रमक
‘बॉक्सिंग डे टेस्ट’ म्हणजे काय?; जाणून घ्या या नावामागील कारण…
अजिंक्य रहाणेच्या झुंजार फलंदाजीसमोर कांगारू बेजार; पहिल्या डावात भारताकडे आघाडी
“भारत भालकेंच्या जागेवर पार्थ पवार यांना संधी द्या”
नव्या वर्षात देशासाठी ‘हा’ संकल्प करा- नरेंद्र मोदी