मनोरंजन

‘साहेब झोपूनच असायचे रिया मॅडम मात्र…’ सुशांतच्या बाॅडिगार्डचे धक्कादायक खुलासे

मुंबई | सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचं प्रकरण नव्या वळणावर जाऊन पोहचलं आहे. सुशांतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती व तीच्या कुटूंबीयांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर रियावर टीकेची झोड उठवली जात आहे. अशातच सुशांतच्या बाॅडीगार्डने केलेल्या दाव्यांनी रियाच्या अडचणीत वाढ होणार आहे.

बाॅडीगार्डने एका मुलाखती दरम्यान म्हटलं की, सुशांत सरांच्या आयुष्यात रिया मॅम आल्यानंतर ते नेहमीच आजारी असत. सर बेशुद्ध अवस्थेमध्ये खोलीत असायचे. तेव्हा वरच्या मजल्यावर रिया मॅडमची पार्टी चालू असायची. या पार्टीमध्ये रियाचे आईवडील आणि भाऊ असायचे. या पार्टीत सुशांतचे आईवडील मला कधीच दिसले नाही.

तसेच सुशांतच्या घरातील जुना सर्व स्टाफ रिया मॅडम यांनी बदलला होता. जुन्या स्टाफमधील केवळ मीच सुशांत सरांच्या कामास होतो, असंही बाॅडीगार्डने स्पष्ट केलंय. तसेच सुशांतला देण्यात आलेल्या औषधांबाबतही त्यानं शंका व्यक्त केली.

औषधांमधील मला काहीच कळत नसून जेव्हा रिया मॅडम सुशांतसाठी औषध आणायला पाठवत तेव्हा मेडिकल दुकानदार नेहमी विचारत असे की, औषधे कुणी मागवली आहेत? या प्रश्नावरून कसलीतरी भयंकर प्रकारची औषध असल्याची शंका माझ्या मनात डोकावत असे, असा दावाही बाॅडिगार्डनं मुलाखती दरम्यान केला आहे

महत्वाच्या बातम्या-

“राजू शेट्टीचा आता काजू शेट्टी झालाय; शेतकऱ्यानं सोडलेला रेडा दिसेल त्या पिकात तोंड घालतोय”

सध्या महाविकास आघाडी सरकारची अवस्था ‘नाचता येईना म्हणे अंगण वाकडं’- चंद्रकांत पाटील

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मोठ्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू

दुचाकीवरून प्रवास करताना लोकल ब्रँडचे हेल्मेट वापरल्यास होणार दंड!

अविनाश… आम्ही ठाण्याला येतोय, कोण अडवतंय बघूया- संदीप देशपांडे

.

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या