मनोरंजन

सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी सीबीआयची धडक कारवाई; ‘या’ 6 जणांविरोधात FIR दाखल

मुंबई | सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला आहे. सीबीआयने याप्रकरणी आता 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती, रियाचे वडील, आई, भाऊ, सॅम्युअल मिरांडा आणि श्रुती मोदी यांचा समावेश आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरू होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून बाॅलिवूडमधील गटबाजी, सुशांतचे चित्रपट या अनुषंगाने तपास करण्यात आला. बाॅलिवूडमधील अनेक दिग्गजांनाही पोलिस चौकशीला सामोरं जावं लागलं.

मात्र सुशांतच्या वडिलांनी बिहार पोलिसात अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी बिहार पोलिसांचं पथक मुंबईत दाखल झाल्यावर मात्र एका नव्या वादाला तोंड फुटलं. त्यानंतर बिहार सरकारनं या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची शिफारस केली होती.

दरम्यान गुजरात केडरचे IPS अधिकारी मनोज शशीधर यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. या पथकामध्ये डीआयजी गगनदीप, आयओ अनिल यादव यांचाही समावेश आहे. सुशांतच्या आत्महत्येचा तपास हाती घेताच सीबीआयने यासंबंधीत व्यक्तींच्या चौकशीला सुरूवातही केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

“अयोध्या मुक्त झाली आता…; आखाडा परिषदेचं हिंदूंना आवाहन

पुणेकरांच्या चिंतेत वाढ; पुण्यातील कोरोनानं ओलांडला ‘हा’ धोकादायक आकडा!

‘या’ कारणाने सुशांतला 4 दिवस झोप नव्हती; सुशांतचा मित्र कुशलचा धक्कादायक खुलासा

सुशांत आत्महत्याप्रकरणी सीबीआयकडून 6 जणांवर गुन्हा दाखल

“अयोध्येत मस्जिद होती, आहे आणि राहील सरकारने ताकदीच्या बळावर बदलला कोर्टाचा निर्णय”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.