मनोरंजन

सुशांतची मॅनेजर दिशाचा मृतदेह निर्वस्त्र आढळला होता का?; मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा!

मुंबई | बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात अनेक खुलासे होत आहेत. दररोज समोर येणाऱ्या नवनवीन गोष्टींमुळे या प्रकरणातील गुंता आणखीनच वाढत चालला आहे. सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सॅलीयननं आत्महत्या केल्यानंतर तीचा मृतदेह नग्नावस्थेत सापडला होता, असा धक्कादायक आरोप करण्यात येत असताना मुंबई पोलिसांनी आता याबाबत मोठा खुलासा केला आहे.

उत्तर मालाडमधील एका मोठ्या बिल्डींगवरून 8 जून रोजी रियानं उडी मारून आत्महत्या केली होती. पोलिसांची टीम घटनास्थळी पोहचली तेव्हा तीचे कुटूंबीय त्याठिकाणी उपस्थित होते. तेव्हा तीचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत नव्हता, असा खुलासा आता मुंबई पोलिसांनी केला आहे.

अतिरिक्त पोलिस आयुक्त दिलीप सावंत म्हणाले की, लोकांकडून खोटे आरोप लावण्यात येत आहेत. घटनास्थळी पोहचताच आम्ही मृतदेहाचे फोटो काढून घेतले होते. मात्र तेव्हा तीचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत आढळून आला नव्हता तसेच अंकिता लोखंडेची देखील चौकशी करण्यात आली असून दिशा सालियानशी बोलणारी अंकिता शेवटची व्यक्ती होती , अशी माहिती त्यांनी यावेळेस दिली आहे.

दरम्यान कॉर्नर स्टोन नावाच्या कंपनीत दिशा सेलेब्रिटी मॅनेजर म्हणून काम पाहत होती. कंपनीतील कामानिमित्त दिशा 1 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान सुशांतच्या संपर्कात होती. या अगोदर किंवा नंतर दिशा आणि सुशांतमध्ये कोणतंही संभाषण झालं नाही,अशी माहिती पोलिसांनी याआधीच दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

दिलासा देणारी बातमी; देशातील उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 15 लाखांच्या पुढे

100 दिवसात ‘या’ देशामध्ये एकाही कोरोना रूग्णाची नोंद नाही; महिला पंतप्रधानाची कमाल!

“70 टक्के नवीन चेहऱ्यांना संधी दिल्यास काँग्रेसचे पुनरुज्जीवन शक्य”

मी सांगितलेलं कुठलंही काम देवेंद्र फडणवीसांनी केलं नाही असं होत नाही- नारायण राणे

चीनमधील ‘या’ महिलेला झालेला आजार पाहून सारं जग झालंय हैराण!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या