मनोरंजन

‘पुराव्यांशी छेडछाड होऊ नये, या प्रकरणात लक्ष द्या’; सुशांतच्या बहिणीचं पंतप्रधान मोदींना आवाहन

नवी दिल्ली | अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांनी गुन्हा दाखल केलाय. यामुळे सुशांतच्या प्रकरणाला नवं वळण मिळालंय. रिया चक्रवर्तीवर अटकेची टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान रिया चक्रवर्तीने व्हिडीयोद्वारे सत्याचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर आता सुशांतच्या बहिणीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केलीये.

सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीने एक ट्विट केलंय. या ट्विटमध्ये तिने ‘मी सुशांत सिंह राजपूतची बहिण आहे आणि तुम्ही या प्रकरणाकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मी विनंती करते. आमचा भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्याल अशी मी अपेक्षा करते’ असं म्हटलंय.

नमस्कार सर, माझ्या मनात कुठे तरी असे वाटते की तुम्ही सत्याच्या बाजूने आहात. आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील आहोत. ज्यावेळी माझा भाऊ बॉलिवूडमध्ये होता तेव्हा त्याच्या कोणी गॉडफादर नव्हता आणि आताही नाही. या प्रकरणाकडे तातडीने लक्ष द्यावे आणि या प्रकरणातील पुराव्यांसोबत कोणतीही छेडछाड होणार नाही अशी मी विनंती करते, असं ट्विट करत तिने पंतप्रधान मोदींना टॅग केलं आहे

यापूर्वी इन्स्टाग्रामवर देवांचे फोटो पोस्ट करत श्वेताने सर्वांना सत्याच्या बाजूने खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केलं होतं. सर्वजण एकीने खंबीरपणे उभे राहुयात आणि सत्याची साथ देऊयात, अशी पोस्ट श्वेताने लिहिली होती.

महत्वाच्या बातम्या-

राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं प्रदीर्घ आजारानं निधन

मटका किंग मुन्ना उर्फ जिग्नेश ठक्कर याची त्याच्याच ऑफिससमोर गोळ्या घालून हत्या

‘साहेब झोपूनच असायचे रिया मॅडम मात्र…’ सुशांतच्या बाॅडिगार्डचे धक्कादायक खुलासे

आत्महत्येच्या रात्री नक्की काय घडलं?; सुशांतच्या मित्राने केला खुलासा

‘सुशांत संशयास्पद औषधं घेत होता’, जीम ट्रेनरचा धक्कादायक खुलासा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या