Top News मनोरंजन

सुशांत आत्महत्याप्रकरणी बिहारच्या उपमुख्यमंत्र्याचा मुंबई पोलिसांवर आरोप, म्हणाले…

बिहार | अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात दर दिवशी नवीन आरोप होताना दिसतायत. सुशांतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केल्यानंतर या प्रकरणाला एक नवं वळणं मिळालं. या सर्व गोष्टींमुळे सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही होऊ लागलीये. अशातच बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी या प्रकरणात मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केलाय.

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी ट्विटरवरून मुंबई पोलिसांवर निशाणा साधला आहे. “सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची बिहार पोलिसांकडून चौकशी केली जात असून, मुंबई पोलिसांकडून निष्पक्ष चौकशीत अडथळा आणला जातोय. त्यामुळे सीबीआयने हे प्रकरण स्वतःकडे घ्यावं, असं भाजपाला वाटतं,” असं सुशील कुमार मोदी यांनी म्हटलं आहे.

सुशांतच्या आत्महत्येचा तीन यंत्रणांकडून तपास सुरु आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला होता. त्यानंतर सुशांतच्या वडिलांनी पाटणात रिया चक्रवर्ती विरोधात तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल झाला. त्यामुळे बिहार पोलिसांनीही या प्रकरणात चौकशी सुरू केलीये. तर 15 कोटी रुपये उकळल्याचा आरोप रियावर केल्याने ईडीने आर्थिक गैरव्यवहाराच्या अंगाने या प्रकरणाची चौकशी सुरू केलीये.

या प्रकरणी तपास सुरु असून चौकशीतून काहीच समोर येत नसल्याने मुंबई पोलिसांवर टीका होत आहे. याच कारणामुळे सुशांतच्या वडिलांनाही मुंबई पोलिसांवर विश्वास नसल्याचं सांगत त्यांच्यावर आरोप केले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

देवेंद्र फडणवीस यांच्या आंदोलनाचे मुहूर्त नेहमी चुकतात- हसन मुश्रीफ

महाविकास आघाडी सरकार लिव्ह इन-रिलेशनमध्ये, 5 वर्ष टिकेल असं वाटत नाही- देवेंद्र फडणवीस

कोरोनाने रेकॉर्ड मोडला, एका दिवसात मिळाले तब्बल एवढे हजार कोरोनाबाधित!

आधी बेदम मारहाण, नंतर मुंडण करून पाजलं मुत्र, राजस्थानातील संतापजनक घटना!

धक्कादायक! बायकोचा मृतदेह ड्रममध्ये भरून हायवे लगतच्या झाडीत फेकून दिला अन…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या