सुशांतच्या घरातील ‘या’ जवळच्या सदस्याचं निधन!

मुबंई | अभिनेता सुशांत सिंह (Sushant Singh) याचा अडीच वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. ती आत्महत्या होती की हत्या याच्यावर अजूनही वाद-विवाद सुरु आहेत. सुशांतचे फॅन या गोष्टीला अमान्य करत आहेत. इतक्यात अजून एक दु:खद घटना घडली आहे.

सुशांत गेल्यानंतर ज्याचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. तो म्हणजे सुशांतचा पाळलेले कुत्रा ‘फज’ (Fudge) याचा मृत्यू झाला आहे. सुशांत गेल्यानंतर अवघ्या अडीच वर्षात फजचा निधन झालं आहे. याची माहिती सुशांतची बहिण प्रियंकाने ट्विट करत दिली आहे.

शेअर केलेल्या फोटोत सुशांतच्या बहिणीने कॅप्शन दिलं आहे. त्यात तिनं लिहिलंय ‘फज अखेर तू सूद्धा स्वर्गात तुझ्या मित्राकडे निघून गेलास, लवकरच भेटीन. तोपर्यंत माझ्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.’

यामुळे सुशांतच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. सुशांतसोबत फजचे फोटो शेअर करत चाहत्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. सुशांतच्या जाण्यानंतर फजसुद्धा एकाकी राहू लागला होता. येत्या 21 जानेवारीला फजचा वाढदिवस (birthday) होता.

महत्त्वाच्या बातम्या