Top News देश राजकारण

“तंत्रमंत्र आणि जादूटोण्याच्या मदतीने लालूू यादव यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला”

बिहार | बिहारमध्ये सध्या निवडणूकीचे वारे वाहत असून जोरदार प्रचारही सुुरु आहे. प्रचारसभेत आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरु असून उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी शनिवारी राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांच्यावर आरोप केलेत.

सुशीलकुमार मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांनी आपल्याला तीन वर्षांपूर्वी आपल्याला जादूटोण्याच्या मदतीने जीवे मारण्याचा प्रयत्न केला असा धक्कादायक आरोप केला आहे.

सुशीलकुमार मोदी त्यांच्या ट्विटमध्ये लिहितात, “लालू प्रसाद यादव हे अंधश्रद्ध व्यक्ती आहेत. त्यांनी मांत्रिकाच्या सांगण्यावरुन पांढरा कुर्ता घालण्याचं बंद केलंय. तर एका मांत्रिकाला राजदचा प्रवक्ताही बनवलंय. 3 वर्षांपूर्वी त्यांनी मला मारण्यासाठी तंत्र पूजा करण्यात आली होती.”

मुळात लालूंचा जनतेवर विश्वास नाहीये. म्हणून ते ते तंत्र मंत्र तसंच पूजाअर्चा करतात. प्राण्यांचे बळी आणि आत्म्यांची प्रार्थनाही करतात, असा आरोप मोदींनी केलाय.

महत्वाच्या बातम्या

फडणवीससाहेब काळजी घ्या अन् कोरोनावर मात करुन लवकर बरे व्हा- रोहित पवार

भाजप मंत्र्याने मतांसाठी काँग्रेस कार्यकर्त्याच्या पायावर ठेवलं डोकं; व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

प्रत्येकाला मोफत लस मिळावी, सर्व देशवासियांचा तो अधिकार आहे- अरविंद केजरीवाल

“विश्व हिंदू परिषदेने धार्मिक स्थळांसाठी मोर्चे काढण्यापेक्षा, प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन करावं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या