महाराष्ट्र मुंबई

शरद पवार हे ‘जाणता राजा’च आहेत; आव्हाडांच्या वक्तव्याचं सुशीलकुमार शिंदेंकडूनही समर्थन

मुंबई | जाणता राजा म्हणून अलिकडे उपमा दिल्या जातात. मात्र जाणता राजा फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत, असं भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. यावर गृहनिर्माण मंत्री आव्हाडांनी होय, शरद पवार हे जाणता राजा आहे, असं म्हटलं होतं. त्यानंतर आता काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदेंनीही आव्हाडांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे.

शरद पवारांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आहे. कोण काय म्हणत हा प्रश्न नाही. शरद पवार हे जाणता राजाच आहे. जाणता राजा म्हणजे एकदम नाव घेऊन बोलणं निराळं आहे. मात्र जनतेनेच त्यांना ही पदवी दिली आहे, असं सुशिलकुमार यांनी म्हटलं आहे.

होय, शरद पवार म्हणजे जाणता राजाच आहे. हाताच्या तळव्यावरती महाराष्ट्राची ओळख असणारे एकमेव नेते म्हणजे शरद पवार. महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पवारांकडे आहे. राज्याच्या गेल्या 60 वर्षाच्या सर्वांगीण विकासामध्ये सर्वाधीक वाटा हा शरद पवारांचा आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज आपण कुणाला म्हणत नाही. कुणाच्या घरात मुलाचं नाव शिवाजी ठेवलं तर काय एनओसी साताऱ्यातून मागवायची का? शिवरायांच्या प्रेमापोटीच हे नाव ठेवलं जातं, असं जितेंद्र आव्हाडांनी उदयनराजेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं..

ठळक बातम्या-

“मुलाचं नाव शिवाजी ठेवलं तर एनओसी साताऱ्यातून मागवायची का?”

छ. शिवरायांवरील पुस्तक मागे घेणार नाही, त्याचं…; उदयनराजेंच्या इशाऱ्यानंतर गोयल यांची प्रतिक्रिया

“भाजपचे हिंदुत्व मनुवादी तर शिवसेनेचे हिंदुत्व धर्मनिरपेक्ष”

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या