सोलापूर| महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर शाखेतर्फे आयोजित ‘सोलापूर रंगे, नेत्यांच्या संगे’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि भाजप नेते सुभाष देशमुख यांनी मुलाखतकाराच्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे देत सोलापूरकरांची मनं जिंकली.
प्रश्न : – सुशीलकुमार हे नाव कसे आणि का ठेवले ?
सुशीलकुमार शिंदे :
प्रेमा तुझा रंग कसा या नाटकात मी काम करत होतो. त्यातूनच पुढे दगडू नावावरून पुढे सुशीलकुमार झालो. लहानपणीचे नाव ज्ञानोबा होते पण मुलं जगत नसल्याने आईने माझे नाव दगडू ठेवलं. एका प्रसिद्ध वकिलांचे नाव सुशील होते. मी पट्टेवाला असताना मग मी माझे नाव सुशीलकुमार ठेवले.
प्रश्न : एक चिमणी भारी कशी पडली…?
2012 साली बोरामणी विमानतळ मंजूर होऊन जागा हस्तांतरीत केली. 2013 साली एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियासोबत महाराष्ट्र सरकारशी करार केला होता. बोरामणी विमानतळासाठी 5 वर्षात मी मुद्दाम प्रयत्न केला नाही. कारण मोदी सरकारमधील लोक सकारात्मक देतील की नाही याबाबत साशंक होतो. बडवे म्हंटले की पांडुरंगाच्या पायावर डोकं बडवणारे असंच वाटतं. मी माझ्या तिनही मुलींना समान मानतो. मातृ देवो भव, पितृ देवो भव ही आपली संस्कृती आहे. मात्र आजची पिढी याबाबत उदासीन आहे. त्यांच्या वर्तनाकडे पाहून वाईट वाटते.
प्रश्न : विरंगुळ्यासाठी आपण काय करता?
मी साहित्यात रमतो, काव्यवाचनाच्या कार्यक्रमाला जातो, तरुणांशी चर्चा करतो. गर्दी ही पोकळ असते आपण आपल्या खऱ्या मित्रांशी हितगुज करणे गरजेचे असते. वेगवेगळ्या पक्षांना एकत्र कसं आणता येईल याबाबत विचार करावा लागेल. मला वाटते की आपले राष्ट्र एकत्र राहील की नाही याबाबत चिंता वाटते. सर्व प्रांत वेगवेगळे होतील की काय असं वाटतं. हे बदलवण्याची जबाबदारी माध्यमांची आहे.
प्रश्न : एक चिमणी भारी कशी पडली…?
चिमणी पाडण्याचे काम मी केलं आहे, अशी अफवा पसरवली होती. त्यानंतर मी धर्मराज काडादी यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दोन्ही देशमुखात काहीही वाद नाहीत. पत्रकारांच्या बातम्यामुळे तशी प्रतिमा निर्माण झालीय. आम्ही दोघेही अबोल आहोत.
प्रणिती शिंदे यांचा देशमुखांना प्रश्न
तुम्हाला तुमच्यातील उद्योजक आवडतो की राज्यकर्ता जास्त आवडतो?
मी व्यवसायात आसतो तर मी खूप श्रीमंत झालो असतो. आई वडिलांचे संस्कारातून मी समाजकारणासाठी राजकारण करतो. सोलापूर महापालिकेच्या कारभारावर आपण समाधानी नाही. समस्येला न्याय देण्याची भूमिका सातत्याने करावी लागणार आहे. मी लहानपणी एका झव्हेरी समाजाच्या महिलेच्या टोपलीतील साहित्याची चोरी केली आणि ते सामान विकले होते. हे घरी कळल्यावर मला सावत्र आईने खूप मारलं आणि देवासमोर नाक घासायला लावलं. दिलखुलास हसणे हे शिंदे साहेबांकडून शिकलं पाहिजे असंही देशमुख यावेळी म्हणाले.
ट्रेंडिंग बातम्या-
तुला मला का भेटायचं होतं?; राज ठाकरेंच्या प्रश्नावर चिमुकलीचं गोंडस उत्तर, पाहा व्हिडीओ
“आम्ही उपाशी आहेत की नाही हे जनता ठरवेल मात्र तुम्ही नेहमी कुपोषित दिसता”
महत्वाच्या बातम्या-
घाबरू नका फोन करा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा कोरोनासाठी नवीन हेल्पलाईन नंबर जारी!
कोरोना रोखण्यासाठी ठाकरे सरकारने घेतेलले 11 मोठे निर्णय; पाहा एका क्लिकवर
Comments are closed.