Top News देश

बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांचा सुशांतसिंग प्रकरणावरून उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप

नवी दिल्ली | सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरण चांगलंच गाजत आहे. सर्वच स्तरावरून या संदर्भात विविध प्रतिक्रिया येत आहे. त्यातच आता बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी सुशांतच्या प्रकरणासंदर्भात थेट महाराष्ट्र सरकारवर आरोप केले आहे.

भाजप नेत्यांनी असा दावा केला होता की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुशांतच्या प्रकरणात काही महत्त्वाच्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, कारण ते काही बॉलिवूड माफियांच्या दबावात आहे. ज्यात मित्र पक्ष काँग्रेस त्यांचे संरक्षण करत आहे, असा खळबळजनक आरोप सुशील मोदी यांनी ट्विट करून केला आहे.

शुक्रवारी सुशील मोदी यांनी ट्विट केले होते की, बिहार पोलीस सुशांतच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी करत आहे, त्यात मुंबई पोलीस अडथळा आणत आहे आणि बिहार पोलिसांना सहकार्य करत नाही. तसेच भाजपला असं वाटतंय की, हे प्रकरण सीबीआयने सांभाळले पाहिजे.

सुशांतच्या मृत्यूप्रकरणात बिहार सरकार सीबीआय चौकशीची मागणी करत आहे. दरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले की, सुशांतच्या वडिलांची इच्छा असेल तर आम्ही राज्य सरकारकडे विनंती करून ह्या प्रकरणाची सीबीआय चौकशीसाठी शिफारस करू.

महत्त्वाच्या बातम्या-

“सेनापती ठाम उभा राहिला मात्र नियतीने त्यांच्या आईची इहलोकीची यात्रा काल संपवली”

3 अनाथ मुलांच्या मदतीला सोनू सूद धावला, घेतली त्यांची सगळी जबाबदारी!

कोरोनाच्या संकटात पुण्यातील गणेशोत्सव मंडळाकडून समाजापुढे नवा आदर्श, घेतला महत्त्वाचा निर्णय!

तो आशीर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील, राजेश टोपेंचं भावनिक ट्विट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या