सगळेच भाजपमध्ये का चाललेत?; सुशीलकुमार शिंदेंनी सांगितलं कारण

सोलापूर | साखर कारखानदारांची गळचेपी करून भाजपने जोरात इनकमिंग चालवली आहे. पण हे फार काळ टिकणार नाही, असं सुशीलकुमार शिंदेंनी म्हटलं आहे. ते सोलापूरात बोलत होते.

लवकरच काँग्रेसचे काही बडे नेते भाजपात प्रवेश करतील या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा समाचार घेत काँग्रेसच्या एका तरी आमदाराने राजीनामा दिला का? असा सवाल सुशीलकुमार शिंदेंनी विचारला आहे.

साखर कारखानदारांना आमिष दाखवलं जात आहे. त्यांना संस्था टिकवायच्या आहेत. म्हणून काही नेते पक्षातरं करत आहेत, असं शिंदेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी मी पेलू शकत नाही आणि मी इच्छुकही नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या-

-“अडचणीचा काळ असला तर काय झालं, आम्ही साहेबांच्या सोबत आहोत”

-राजीनाम्याच्या निर्णयानंतर चित्रा वाघ सोशल मीडियावर ट्रोल!

-रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादीनं दिली बढती; ‘या’ महत्वाच्या पदावर निवड

-एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये जाणार???; ‘या’ नेत्याचा दावा

-आत्तापर्यंत 20 जणांचा पवारांना रामराम तर ‘हे’ 9 जण सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत!