बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुशीलकुमार शिंदे हे सोलापूरचे राजकीय बाप, ते सांगतील तो सल्ला ऐकण्यास तयार- सुभाष देशमुख

सोलापूर | सुशीलकुमार शिंदे हे सोलापूरचे राजकीय बाप आहे. बापाचं वय झालं तर पोराला वाटतं की आत काय बापाचं ऐकायचं. पण बाप हा बापच असतो. बापाचा एक सल्ला मुलाच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतो, अशा शब्दात माजी मंत्री आणि भाजप नेते सुभाष देशमुख यांनीमाजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचं कौतुक केलंय.

सोलापुरात ज्येष्ठ पत्रकार राजा माने आणि सुधीर महाजन यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्य़क्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि राज्याचे माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी सुभाष देशमुख बोलत होते.

राजकीय बाप म्हणून आम्ही सगळे तुमचा सल्ला नक्की ऐकणार. तुमच्या अनुभवाचा आणि संबंधांचा आम्हाला फायदाच होईल. सोलापूरच्या कोटणीस स्मारकावर तुम्ही चायनाचे लोक आणत जा. तुमच्या पत्राला वजन आहे. तिथले राजदूत इकडे येतील. त्यामुळे कोटणीस स्मारकाचा जगभरात लौकिल होईल, असं सुभाष देशमुख म्हणाले.

दरम्यान, आपण खूप चांगलं काम केलं आहे. तुमचे खूप चांगले संबंध आहेत सोलापूरचा नागरिक आणि पुत्र म्हणून तुम्ही सांगाल ते ऐकायला तयार आहे, फक्त राजकीय सोडून, असंही सुभाष देशमुख यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

“मोदींच्या सभेत काळ्या टोप्या आणि काळे मास्क उतरवण्यात आले, कलियुग म्हणतात ते हेच का?”

“राज्यात पुन्हा भाजपचं सरकार येणार, पुन्हा भाजपचा मुख्यमंत्री होणार”

हर्षवर्धन पाटलांच्या चुलत भावाचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश!

“स्वप्नीलच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांना भेटायला जावं लागलं, हे निबर कातडीचं सरकार”

‘ही’ अभिनेत्री लवकरच करणार कमबॅक; दाऊदसोबतच्या संबंधांमुळे आली होती चर्चेत

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More