बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील ‘या’ नेत्याच्या गळ्यात पडणार काँग्रेस अध्यक्षपदाची माळ??

नवी दिल्ली |  लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवाच्या पार्श्वभूमीवर नवा काँग्रेस अध्यक्ष कोण असणार याबद्दलच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातून ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता आहे.

सुशीलकुमार शिंदे आज(रविवारी) राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर अंतिम घोषणा होणार आहे असं काँग्रेसच्या गोटातून कळतंय. हे वृत्त ‘सकाळ’ने प्रसारित केलं आहे.

राहुल गांधी यांच्यानंतर काँग्रेस अध्यक्ष कोण होणार हा प्रश्न काँग्रेसला सतावत होता. पण या प्रश्नाला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खरगे, सचिन पायलट, अशोक गेहलोत, पृथ्वीराज चव्हाण यांची नावे चर्चेत होती.

महत्वाच्या बातम्या-

-काँग्रेसकडून हे 2 बडे नेते करणार वंचित बहुजन आघाडीशी चर्चा; तोडगा निघणार??

-शाहू महाराजांनंतर देवेंद्र फडणवीसांनीच मराठा समाजासाठी कामं केलं- मेटे

-‘अल्लाहने दाखवलेल्या रस्त्यापासून मी भटकले होते’ म्हणत या अभिनेत्रीने घेतला 18 व्या वर्षी संन्यास

-आणीबाणीत देशातील लोकशाही हिरावली; मोदींची ‘मन की बात’

-भाजप आमदाराची सुटका झाली म्हणून कार्यकर्त्यांनी केला हवेत गोळीबार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More