पप्पा माझी जीभ घसरली, पण मला त्यांच्याबद्दल असं बोलायचं नव्हतं- प्रणिती शिंदे

सोलापूर | काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी खासदार शरद बनसोडे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्या वक्तव्यावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदेंनी सफाई दिली आहे.

ते म्हणाले, प्रणितीचा मला फोन आला होता, पप्पा माझी जीभ घसरली. पण मला त्यांच्याबद्दल असे बोलायचे नव्हते, मात्र माध्यमांनी तेच वाक्य उचललं.

खासदार बनसोडे यांच्याबाबत माजी आमदार प्रणितींकडून चुकून बोलले गेले. त्याबाबत त्यांनी माझ्याकडे खुलासा केला आहे. आता हा वाद संपला असून खासदार बनसोडे यांच्याबद्दल आम्हा दोघांनाही आदर आहे, असं सुशिलकुमार शिंदे यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-खासदार बनसोडेंबद्दल आम्हाला आदर आहे, प्रणिती चुकून बोलली- सुशिलकुमार शिंदे

-सारा अली खानच्या ‘केदारनाथ’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

-सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काहीही असो, आम्ही राम मंदिर उभारणारच!

-…म्हणून विराट बीसीसीआयकडे मागतोय केळी

-भाजप अध्यक्ष अमित शहांविरोधात देशद्रोहाची तक्रार