Top News पुणे महाराष्ट्र

भाजपच्या हिंदुत्वाला शिवसेनेनं चांगला धडा शिकवला- सुशीलकुमार शिंदे

पुणे | शिवसेना आज ज्या किमान समान कार्यक्रमनुसार सत्तेत आली तेच हिंदुत्व प्रबोधनकारांना अपेक्षित होते आणि तेच खरं हिंदुत्व असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाप्रसंगी पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिर येथील कार्यक्रमात ते बोलत होते.

शिवसेनेनं सत्तेसाठी हिंदुत्वाला मुरड घातली असं मला तरी वाटत नाही. कारण किमान समान कार्यक्रम हा प्रबोधन ठाकरे यांनी वेगळ्या रुपाने आधी मांडला होता. त्याला उद्धव ठाकरेंनी चांगली साथ देत भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं असं म्हणत शिंदेंनी भाजपवर निशाणा साधला.

दरम्यान, आपण सर्वांनी पुढे जाऊयात असं आवाहनही शिंदेंनी महाविकास आघाडीतील नेत्यांना केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“केंद्र सरकारचे कान उपटून हातात द्यायला आज बाळासाहेब हवे होते’

सरकारने एल्गार परिषदेला अचानक परवानगी का दिली?- ब्राह्मण महासंघ

भाजपला धक्का! 11 नगरसेवकांनी भाजपची साथ सोडत हाती धरलं धनुष्य

जम्मूमध्ये सीमेजवळ पुन्हा आढळला बोगदा!

लालू प्रसाद यादव दिल्लीच्या एम्स रूग्णालयात दाखल!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या