बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष, काका-पुतण्याच्या ताटाखालचे मांजर नाही”

सोलापूर |  राष्ट्रवादी काँग्रेस हा नऊ जिल्ह्यांपुरता पक्ष आहे तर काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे आम्ही काका-पुतण्याच्या ताटाखालचं मांजर नसल्याचं ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी म्हटलं आहे. भानुदास माळी हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

आम्ही काका-पुतण्याच्या ताटाखालचे मांजर नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची होणारी घुसमट आणि सापत्न वागणुकीबद्दल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षश्रेष्ठींना त्यांची भूमिका पटवून दिली आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रात स्वबळावर निवडणुका लढविण्यास पक्षश्रेष्ठींकडून होकार आल्याचा दावा ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी केला आहे.

महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आहे. मात्र काँग्रेसच्या वाट्याला आलेली मंत्रिपदं आणि मिळणारा निधी हा राष्ट्रवादी-शिवसेनेला मिळणाऱ्या निधीपेक्षा खूपच कमी असल्याचं भानुदास माळी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कॉंग्रेस पक्षात प्रचंड नाराजी पसरली आहे. या सर्वांमुळे आगामी काळातील निवडणुकांत कॉंग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याचं भानुदास माळी म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

‘राज्याचे मुख्यमंत्री बेशरम आहेत’; आमदार रवी राणांची जीभ घसरली

महाराष्ट्रात आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, पण धोका अद्याप टळलेला नाही! 

‘प्राण्यांना शारिरीक इजा केल्यामुळे भाई जगतापांवर गुन्हा दाखल करा’; आयुक्तांकडे तक्रार

‘राहुल गांधींना राष्ट्रीय नेता बोलल्याचं बैलांना आवडलं नाही त्यामुळे….’; राहुल गांधींना फडणवीसांंचा चिमटा

मुंबईतील कोरोना आला आटोक्यात; नव्या बाधितांसह सक्रिय रूग्णसंख्येत घट!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More