Top News पुणे महाराष्ट्र

“पुणे हे राष्ट्रीय स्वंयंसेवक संघाचा अड्डा”

पुणे | पुणे हे राष्ट्रीय स्वंयंसेवक संघाचा अड्डा आहे आणि त्या पुण्यात प्रबोधनकारांची आणि शिवसेना प्रमुखांची जयंती साजरी होत आहे. ही मोठी ऐतिहासिक घटना असल्याचं म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी संघावर टीकास्त्र सोडलं.

पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रबोधन शतक महोत्सव आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाप्रसंगी सुशीलकुमार शिंदे हे बोलत होते.

राज्यात शिवसेना 20 वर्षानंतर सत्तेत आली असून, खरंतर हेच 25 वर्षे आधी व्हायला हवं होतं. त्यामुळे आता पुढे जाऊ या, असं आवाहनही सुशीलकुमार शिंदे यांनी महविकास आघाडीतील नेत्यांना केलं.

दरम्यान, शिवसेनेनं सत्तेसाठी हिंदुत्वाला मुरड घातली असे मला तरी वाटत नाही. कारण, किमान समान कार्यक्रम हा प्रबोधन ठाकरे यांनी वेगळ्या रुपाने आधी मांडला होता. त्याला उद्धव ठाकरेंनी चांगली साथ देत भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं असं म्हणत शिंदेंनी भाजपवरही निशाणा साधला.

थोडक्यात बातम्या-

“ममता बॅनर्जी जय श्रीरामच्या घोषणा म्हणजे वळूला लाल कापड दाखवण्यासारखं”

राजकारणासाठी कोरोना लस व्यतिरिक्त अनेक व्यासपीठ, तिथं या दोन हात करु- अमित शहा

TikTok सह इतर चायनिज अ‍ॅप्सवरील बंदी कायम राहणार!

आगे आगे देखो होता है क्या- प्रसाद लाड

आरएसएसमध्ये महिलांचा सन्मान नाही, ही पुरुषवादी संघटना- राहुल गांधीS

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या