बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शरद पवार गुगली टाकण्यात एक्सपर्ट’; काँग्रेसच्या या बड्या नेत्याचं सूचक वक्तव्य

मुंबई |  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे. यावर अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिली आहे. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना सूचक वक्तव्य केलं आहे.

शरद पवार गुगली टाकण्यात एक्सपर्ट असल्याने आजच्या मोदी -पवार भेटीचा वेगळा अर्थ लावण्याची काही गरज नाही, असं सुशिलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे. न्यूज 18शी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. शरद पवार हे महाविकास आघाडीतचे ज्येष्ठ नेते आहे. मुळात पवारसाहेब हे गुगली टाकण्यात एक्सपर्ट आहे. त्यामुळे आजच्या मोदी-पवार भेटीचा वेगळा अर्थ लावण्याची काही गरज नाही. महाविकास आघाडी सरकार हे भक्कम आहे, असं सुशिलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची स्वबळाची भाषा योग्यच आहे. प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आम्हालाही आमचा काँग्रेस पक्ष पुन्हा खंबीर करायचा आहे. त्यामुळे जवळ आहे तोवर जवळ, नाही तेव्हा बघू पुढं काय करायचं ते, असं सूचक वक्तव्य सुशिलकुमार शिंदेंनी केलं.

दरम्यान, पूर्वी नाबार्डचं बंधन या सर्व बँकांवर होतं. नाबार्डचं बंधन काढून केंद्राने आरबीआयचं बंधन घातलं आहे. देशात राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका नागरिकांना दाद देत नाहीत त्यामुळे महाराष्ट्र, गुजरातमध्ये सहकार क्षेत्र भक्कमपणे उभं राहिलं. बँकांना आता निर्बंधांत आणण्यात आलं आहे आणि हे निर्बंध कमी करण्याच्या मागणीसाठी शरद पवार गेले आहेत, असंही जयंत पाटलांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

“भाजप ही वॉशिंग मशीनसारखी झाली असून इथे डाकू पण साधू होवू शकतो”

दिलासादायक! मुंबई कोरोनामुक्तीच्या वाटेवर; आजची रुग्णसंख्या आली 500 च्या खाली

पुणे कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंवर ‘या’ कारणाने गुन्हा दाखल

‘अजित पवारांना उदंड आयुष्य लाभावं, राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत’; अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त 30 क्विंटल साखरेचं वाटप

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More