Sushma Andhare l लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वच राजकीय नेत्यांनी कंबर कसली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला गेलेलं हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत सुषमा अंधारे आणि पायलट हे दोघेही सुखरूप आहेत. मात्र या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचा व्हिडीओ समोर :
सुषमा अंधारे यांना घ्यायला गेलेलं हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, हेलिकॉप्टर नेमकं कशाप्रकारे क्रॅश झालं आहे. तसेच ही घटना महाडमध्ये घडली आहे. सर्वात महत्वाचं सुषमा अंधारेच्या बसण्यापूर्वी हे हेलिकॉप्टर क्रॅश झाल आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, आज सकाळी 9.30 वाजता सुषमा अंधारे या बारामतीच्या दिशेने जाणर होत्या. कारण बारामतीमध्ये आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात त्या सहभागी होणार होत्या. त्यासाठी त्या महाडहून बारामतीला निघाल्या होत्या. मात्र यावेळी सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये बसणार अगदी त्याअगोदरच हे हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. सुदैवाने हा एकप्रकारे अनर्थ टळला आहे.
महाराष्ट्र के महाड में शिवसेना (UBT) के नेता सुषमा अंधारे के लिए सभा में ले जाने आया हेलीकॉप्टर हुआ क्रैश
सुषमा अंधारे के हेलीकॉप्टर में चढ़ने से पहले ही हेलीकॉप्टर क्रैश हुआ ।
दोनों पायलेट सुरक्षित । pic.twitter.com/3A4TozLFZP— Harish Tiwari (@harishtiwari6) May 3, 2024
Sushma Andhare l या अपघातात हेलिकॉप्टरचे झाले तुकडे :
हेलिकॉप्टर क्रॅश झालेला व्हिडीओ समोर आल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. या अपघातात हेलिकॉप्टरचे तुकडे झाल्याचं दिसत आहे. हा संपूर्ण अपघात सुषमा अंधारे यांच्या समोरच घडला आहे. महत्वाची बाब म्हणजे या घटनेतील हेलिकॉप्टरचा पायलट हा सुखरुप आहे.
बारामतीला जाण्यासाठी त्या हेलिपॅडवर पोहचल्या. हेलिकॉप्टरचा अपघात सुषमा अंधारे यांच्या समोरच झाला आहे. या अपघातात हेलिकॉप्टरचे तुकडे झाले. महत्वाची बाब म्हणजे या घटनेतील हेलिकॉप्टरचा पायलट हा सुखरुप आहे. स्थानिकांच्या मदतीने क्रॅश झालेल्या हेलिकॉप्टर पायलटला बाहेर काढण्यात आले आहे.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, हेलिकॉप्टरची दृश्य अतिशय भयावह आहेत. या घटनेनंतर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहेयावेळी त्या म्हणाल्या की, मी सुखरूप आहे. तसेच माझ्यासह कॅप्टन आणि असिस्टंट आणि माझा लहान भाऊ विशाल गुप्ते आम्ही सर्वजण सुखरूप आहोत चिंता नसावी.
News Title – Sushma Andhare Helicopter Crash Video
महत्त्वाच्या बातम्या –
कोपर्डी बलात्कार प्रकरणात नवा ट्विस्ट; …त्याला स्मशानभूमीत रात्रभर नग्न बसवले
मोठी दुर्घटना! हेलिकॉप्टर झालं क्रॅश; सुषमा अंधारे अन् पायलट…
काँग्रेसचं ठरलं! राहुल गांधी निवडणुकीच्या रिंगणात; या दोन गोष्टींमुळे गांधींचं पारडं जड राहणार
धक्कादायक… ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांवर हल्ला
या राशीच्या व्यक्तींनी सावधान; मित्रांशी मतभेदाची शक्यता