“पंकजा मुंडे मंत्री होत्या, प्रीतम मुंडे खासदार होत्या, मग बीडचा विकास का केला नाही?”

Sushma Andhare | शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.त्यांनी लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा झालेला पराभव यावर देखील भाष्य केलं. आष्टी, पाटोद्यात मतदारांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना मतदान केलंच नाही, त्यामुळे निष्कारण जातीवादाचं रुप देणं चुकीचं असल्याचं अंधारे म्हणाल्या.

“परळीत आणि बीडमध्ये विकास झाला का?”

“जी माणसं असं म्हणतात पंकजा मुंडे निवडून आल्या असत्या तर फार विकास झाला असता, आत्तापर्यंत त्यांचा कोणी हात धरला होता का?, परळीत आणि बीडमध्ये विकास झाला का?”, असा खोचक सवाल सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केलाय.

“लोकसभा निवडणूक जातीवादावर नाही तर विकासावर गेली आहे. इथल्या प्रश्नावर चर्चा कोणी करणार आहे की नाही? आष्टी, पाटोदा या ठिकाणच्या मतदारांनी पंकजा मुंडे यांना मतदान केलंच नाही, त्यामुळे निष्कारण त्याला जातीवादाचं रूप देणं चुकीचं आहे.”, असं अंधारे म्हणाल्या.

“गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्याईनं पंकजा मुंडे आमदार झाल्या”

पुढे त्या म्हणाल्या की, ” गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्याईनं पंकजा या आमदार झाल्या. ग्रामविकास मंत्रालय त्यांनी संभाळलं. त्यांची बहीण प्रीतम मुंडे या देखील खासदार होत्या. मग का केला नाही विकास?, परळीत एमआयडीसी का येऊ शकली नाही?”, असा संतप्त सवाल यावेळी अंधारे (Sushma Andhare) यांनी मुंडे बहीणींना विचारला.

पुढे अंधारे यांनी लोकसभेमधील पराभवाबाबतही भाष्य केलं. आपल्या पराभवाचं खापर मराठा किंवा ओबीसी जातींवर फोडण्यापेक्षा आपल्या नेत्यांना का विचारत नाही? मोदी यांनी इथे जातीवादी भाषण केलं. असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. आता यावर पंकजा मुंडे काय प्रत्युत्तर देतात ते पाहावं लागेल.

News Title –  Sushma Andhare on Pankaja Munde

महत्त्वाच्या बातम्या

“…तर निवडणूक स्वतंत्र लढावी लागेल”; अमोल मिटकरींचं मोठं वक्तव्य

वयाच्या 50 शीत मलायकाला प्रेमात मिळाला धोका?; अर्जुनच्या वाढदिवशी केली क्रिप्टिक पोस्ट

पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुढील 7 दिवसांसाठी चंद्रकांत पाटील यांनी केली ‘ही’ घोषणा

पुणे पोर्शे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर, मृताच्या आईचा संताप

“मुंबई से आया मेरा दोस्त…”, राशिद खानची रोहित शर्मासाठी पोस्ट