Maharashtra l शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीतील निवासस्थानी जाऊन शरद पवार यांची भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र त्यांच्या या भेटीची राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा रंगली आहे. अशातच यासंदर्भात रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांनी मोठं देखील वक्तव्य केलं आहे.मात्र यावर आता सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या? :
काल म्हणजेच 12 डिसेंबरला शरद पवार यांचा वाढदिवस होता, त्यामुळे सर्वजण कुटुंब म्हणून एकत्र येणं ही गोष्ट स्वाभाविक आहे. परंतु सुनंदा पवार या नेमक्या कोणत्या संदर्भानं म्हटल्या आहेत. तसेच दोन्ही पवारांनी कुटुंब म्हणून एकत्र यायला हवं की राजकारणात एकत्र यायला हवं? असा सवाल देखील सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
Maharashtra l …तर महाविकास आघाडीत अस्वस्थता होईल :
यासंदर्भात सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की, राजकारण म्हणून एकत्रित यायला हव असेल तर अजित पवार यांच्या संगतीत जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लोक आहेत ते माळशिरस येथील मारकडवाडीत जाऊन शरद पवार साहेबांबद्दल कमालीचे अपशब्द वापरतात त्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काय भूमिका आहे?
तसेच लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील महिला आयोगावर असणाऱ्या बाई टीका करत असताना अत्यंत बिकट हास्य करत होत्या, हे मात्र सगळं चीड आणणारं आहे. तसेच या लोकांबद्दल नेमकी भूमिका काय आहे? त्यामुळे सुनंदा पवार जर दोन्ही पवारांनी राजकारणात एकत्र आलं पाहिजे असं म्हणत असतील तर त्याचा महाविकास आघाडीवर मक्कीच परिणाम होईल. तसेच त्यामुळे महाविकास आघाडीत अस्वस्थता होणं फार स्वाभाविक आहे, असं देखील सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
News Title –Sushma Andhare reaction on Sharad Pawar & Ajit Pawar meeting
महत्त्वाच्या बातम्या-
एकनाथ शिंदेंच्या खुर्चीला इतिहासात महत्त्व राहिलेलं नाही; शिंदेंच्या बड्या नेत्याचं वक्तव्य
शिवसेनेला 9 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्रीपदं?, संभाव्य मंत्र्यांची यादी समोर
शरद पवारांचे 5 खासदार फोडा, तरच अजितदादांना केंद्रात मंत्रीपद?, खळबळजनक दावा समोर
ब्रेकिंग! ‘पुष्पा 2’ चित्रपटामुळे अल्लू अर्जुनला अटक?
“आमदारांसाठी रुग्णवाहिका तयार ठेवा, मंत्रीमंडळ विस्तारात…”; संजय राऊतांनी डिवचलं