“रामदेव बाबांवर आधी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे”
मुंबई | महिलांनी साडी नेसली तरी छान दिसतात. सलवार कमीज घातलं तरी छान दिसतात. माझ्या मते तर काही नाही घातलं तरी छानच दिसतात, असं वक्तव्य योगगुरू रामदेव बाबांनी (Ramdev Baba) केलं होतं. यावरून आता शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी रामदाव बाबांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीये.
महिलांनी कपडे घातले नसले तरी त्या सुंदर दिसतात असं वक्तव्य योगगुरू रामदेवबाबा यांनी केलं होतं. त्यांनी ज्यावेळी असं वक्तव्य केलं होतं, त्यावेळी तिथे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) त्या ठिकाणी उपस्थित होत्या तरीही रामदेवबाबा यांच्या बेताल वक्तव्याबद्दल कुणीही आक्षेप का घेतला नाही, असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
योगगुरु रामदेवबाबा यांनी बेताल आणि महिलांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असं वक्तव्य केल्यानंतर अमृता फडणवीस असो की राज्यातील एकाही व्यक्तीला त्याबद्दल काही वाटत नाही त्यावरूनच राजकारण समजून येतं, असा टोला सुषमा अंधारे यांनी भाजपमधील नेत्यांना लगावला.
दरम्यान, सगळ्यात आधी रामदेवबाबांवर आधी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला पाहिजे असं स्पष्ट मत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
- विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; बसचा भीषण अपघात
- मोठी बातमी! राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी
- सत्यजित तांबेंबाबत अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…
- ‘माझ्या जिवाला धोका’, उर्फीने केली मोठी मागणी
- वंचितला सोबत घेण्याबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.