“वेळ प्रत्येकाची येते, आज तुमचा टाईम असेल, उद्या आमचा टाईम असेल”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

गोंदिया | शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राज्य सरकारवर (State Goverment) सडकून टीका केली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय.

15 ऑगस्टला पंतप्रधान मोदी हे भाषण देत होते. भाईओ और बहनौ आझादीचे 75 साल. हर घर मे तिरंगा लगेला. आम्ही मोदीजींचं ऐकलं. माऊलीला घरचं नाही. तिरंगा कुठं लावयचा. हे प्रश्न आम्ही महाप्रबोधनमधून विचारलं तर झोंबतं, असंही अंधारे यांनी सांगितलं.

घरकुल आवास योजनेचं काय झालं. पंतप्रधानांनी फेकून दिलं. 130 कोटी घरं बनवतोय. काय प्रत्येक व्यक्तीला घर देणार का. आम्ही आदिवासी झेंडा लावू इच्छितो. पण, झेंडा लावायला घरचं नाही. मग, झेंडा कुठं लावायचा, असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला आहे.

देवेंद्र फडणवीस भंडाऱ्यात बोलले, आता धान खरेदीला सुरुवात केली. शेतकऱ्याला हे मिळालं पाहिजे ते मिळालं पाहिजे. अजूनही धान खरेदीला सुरुवात झाली नाही. काय करणार आहात. चौकशीचे आदेश दिले खरं. पण, चकार शब्द काढण्यात येत नाही, अशी टीकाही त्यांनी केलीये.

दरम्यान, असे अडचणीत आणणारे प्रश्न विचारू नका, असं सांगतात. असे प्रश्न विचारणाऱ्याला बदनाम करण्याचा प्रश्न विचारला जातो. पंतप्रधान तीन-चार किलो शिव्या खातात. तर मग पाव-पाव किलो आम्ही बी शिव्या खाऊ, असं सुषमा अंधारे म्हणाल्यात.

महत्त्वाच्या बातम्या-