“वेळ काळ सांगा मी लढायला तयार”, सुषमा अंधारेंचं ‘या’ नेत्याला थेट चॅलेंज

पुणे | कैदी ललित पाटीलबाबात धक्कादायक खुलासे बाहेर येत आहेत. पुण्याच्या ससून रुग्णालयात ललित पाटील काही दिवस मुक्कामी होता. त्यानंतर पोलिसांना त्याच्या ड्रग्स प्रकरणाची माहिती कळाल्यावर तो ससून रुग्णालयातून फरार झाला.

ललितला पळून लावण्यात राजकीय नेते मंडळींचा हात आहे, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. त्यानंतर त्यांनी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर देखील या प्रकरणात आरोप केला. अंधारेंनी केलेल्या आरोपांना शंभूराजे देसाई यांनी उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले शंभूराजे देसाई?

ललित पाटील प्रकरणात सुषमा अंधारे यांनी माझं नाव घेतलं होतं. त्यानंतर माझी नार्को टेस्ट करण्याची मागणी देखील त्यांनी केली होती. मात्र पाटण तालुक्यातील आमच्या कार्यकर्त्यांनी सुषमा अंधारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणी केस दाखल करण्यात आली आहे. अंधारे यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करणार आहोत, असं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. त्यावर सुषमा अंधारे यांनी एका वाक्यातच प्रतिक्रिया दिली आहे.

शंभूराज देसाई तक्रार करत असतील तर मी त्याचं स्वागत करते. चांगली गोष्ट आहे. असं दबावतंत्र वापरून घाबरवू शकत असतील तर मी फेस करायला तयार आहे. ललित पाटील प्रकरणी ससून डीनची नार्को टेस्ट करा, सगळं पुढे येईल, असं देखील अंधारे म्हणाल्या. लाखोंची ड्रग्ज विक्री होते, मग कायदा सुव्यवस्था आहे का? याबाबत गृहमंत्र्यांना मी प्रश्न विचारत आहे. शंभूराजे वेळ, तारीख सांगा मी लढायला तयार आहे, असं आव्हान देखील सुषमा अंधारे यांनी दिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

लोकांची दिवाळी गोड!, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली सर्वात मोठी घोषणा

“आम्हाला जिवंत जाळण्याचा प्लॅन होता”, माजी आमदाराच्या आरोपांनी खळबळ

उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का बसणार?, “आता उरलेले आमदार…”

‘ते 10 लाखांचे चेक्स…’; आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबीयांची सरकारकडून अवहेलना

खासदार अमोल कोल्हे कोणत्या गटात?, ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा