नवी दिल्ली | कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताला दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी तत्कालीन परराष्ट्रमंत्री आणि भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
भारताचे वकील हरिश साळवे यांचेही त्यांनी आभार मानले आहेत. साळवे यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू अतिशय प्रभावीपणे मांडल्यानेच हा विजय मिळाला. कुलभूषण यांचं कुटुंबही आनंदी असेल, असंही स्वराज यांनी म्हटलं आहे.
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली आहे. 15/1 अशा मतांनी भारताने हा विजय मिळवला आहे.
दरम्यान, कुलभूषण जाधव प्रकरणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे.
I thank the Prime Minister Shri @narendramodi for our initiative to take Jadhav’s case before International Court of Justice. /2
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) July 17, 2019
महत्वाच्या बातम्या-