बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘गोल्ड डिगर’ म्हणणाऱ्यांना सुष्मिता सेनने झाप झापलं, म्हणाली…

मुंबई | चार दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि देशातील फरार उद्योगपती ललित मोदी (Lalit Modi) यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा सगळीकडे रंगल्या होत्या. ललित मोदींनी सुष्मिता सेनसोबतच्या नात्याची कबूली दिल्याने सगळीकडे चर्चांना उधाण आलं. सुष्मिताचे यापूर्वीचे अफेअर्स ते अगदी ललित मोदी आणि सुष्मिताची संपत्ती या सगळ्याची चर्चा रंगली होती.

ललित मोदीसोबतच्या नात्यानंतर नेटकऱ्यांकडून सुष्मिताचा गोल्ड डिगर (Gold Digger) असाही उल्लेख करण्यात आला. त्यानंतर सुष्मिता सेनने इन्साटाग्रामवर पोस्ट टाकत तिच्या विषयी चर्चा करणाऱ्यांना चांगलेच झापले आहे. ती म्हणाली, काही कथित बुद्धीजीवी लोक आणि त्यांच्या हीन दर्जाच्या तऱ्हा, आणि त्यांच्या मजेशीर गप्पा, गोष्टी. अज्ञानी असलेले आणि मला कधीच न भेटलेले माझे मित्र आणि मी कधीच भेटले नाही असे ओळखीचे, सगळेच त्यांची दिव्य मते आणि माझ्या चारीत्र्याबद्दल आणि खाजगी आयुष्याबद्दल ज्ञान पाजळत आहेत.

मला गोल्ड डिगर म्हणणाऱ्यांना मी ऐवढेच सांगेन की, मी सोन्याहून खोल विचार करते, आणि मी नेहमीच हिऱ्यांना प्राधान्य दिले आहे. आणि हो मी अजूनही स्वत: विकत घेते. तसेच तिने तिच्या चाहत्यांचे आभार मानले. माझ्या शुभचिंतकांचे मनापासून असणारे समर्थन मला भावते आहे. ते पुढेही देत रहातील. कृपया जाणून घ्या तुमची सुश पुर्णपणे व्यवस्थित आहे, असंही सुष्मिता म्हणाली.

दरम्यान, सुष्मिता सेन पुढे म्हणाली, मी कधीही ग्लॅमर आणि टाळ्यांच्या क्षणिक उधारीवर जगले नाही. मी एक तळपता सूर्य आहे. मी मध्यस्थ असणारी आणि स्वत: मध्ये हरवलेली स्त्री आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

‘शरद पवार म्हणाले आणि आम्ही विरोधी बाकांवर बसलो’, जितेंद्र आव्हाडांनी सांगितली ‘ती’ आठवण

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात, सरकारची कोंडी करण्यासाठी विरोधक सज्ज

देशात कोरोनाची चौथी लाट आली?, धडकी भरवणारी आकडेवारी समोर

‘आता राऊतांनीच जरा शांततेची भूमिका घ्यावी’ -दीपाली सय्यद

‘संजय राऊत मुर्ख माणूस, त्यांनी फक्त…’; राऊतांवर टीका करताना शिरसाटांची जीभ घसरली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More