मुंबई | अभिनेत्री सुश्मिता सेनला (Sushmita Sen) ह्रदयविकाराचा झटका आला होता. सुश्मिता सेननं (Sushmita Sen) याबाबत मोठा खुलासा केला आहे. तिनं आपली एन्जियोप्लास्टी झाल्याचं देखील सांगितलं आहे.
ह्रदयरोगतज्ज्ञांनी हे कंफन्म केलं की, हा मोठा झटका होता. योग्यवेळी योग्य उपचार केल्याबद्दल डॉक्टरांचे आभार. त्यातून मी बचावली आहे, ही गूड न्यूज देण्यासाठी ही पोस्ट केली आहे.
गॉड इज ग्रेट असा हॅशटॅग तिने दिला. सुश्मिताच्या (Sushmita Sen) चाहत्यांनी लवकर बरी होण्याची प्रार्थना केली. चाहत्यांनी तिच्या या पोस्टवर लवकर बरी हो, अशी सदिच्छा दिली. कुणी स्ट्राँग वुमेन तर कुणी आणखी काही अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पाच वर्षे वेगवेगळ्या आजारांशी झुंज देत आहे. गेली पाच वर्षे माझ्या जीवनात अंधार आहे. परंतु, बोगद्यातून प्रकाश यावा, तसं माझं जीवन आहे. आशेचा एक किरण आहे. माझ्या जीवनात काहीतरी चांगलं होतं. मी खडतर परिस्थितीशी झुंज देते, असं सुश्मिता म्हणाली.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.