बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पतीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय, पत्नीने संशय आलेल्या महिलेसोबत केलं हे धक्कादायक कृत्य

नवी दिल्ली | गुजरातमधील सुरत येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या पतीचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचा संशय महिलेला आला. या संशयातून महिलेने संशयित महिलेच्या ठिकाणी धाव घेतली. एवढेच नाही तर त्या महिलेचे जबरदस्तीने केस देखील कापले. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला आहे.

संबंधित घटना ही सुरतमधील पलसाना तालुक्यातील तातीथईया गावातील आहे. या घटनेचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. एका व्यक्तीचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचा संशय त्याच्या पत्नीला आला. यानंतर संबंधित पत्नीने संशय असलेल्या महिलेच्या ठिकाणी आपल्या दोन मैत्रिणींसह धाव घेतली.

महिलेजवळ जाताच पत्नीच्या मैत्रिणीने महिलेला पकडलं. त्यानंतर पत्नीने महिलेच्या केसांना जबरदस्ती कात्री लावली. यावेळी महिलेने आपल्या बचावासाठी आरडा-ओरड देखील केली. मात्र काही जण पत्नीच्या बाजून केस कापण्यास मदत करत होते तर काही जण व्हिडीओ बनवून हसण्यात व्यस्त होते.

दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी संबंधित पत्नीसह आणखी दोन व्यक्तींना अटक केली आहे. याआधी देखील दोघींमध्ये वाद झाला होता. मात्र त्यानंतर महिला आपल्या गावी गेली. तसेच आता ती पुन्हा परतल्याने संशय अधिक वाढला आणि पत्नीने हे टोकाचं पाऊल उचललं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘राजीव गांधींचं नाव हटवताच भारताला सुवर्ण मिळालं’; ‘या’ निर्मात्याचं वादग्रस्त वक्तव्य

मोदी हे देशाला लागलेले व्हाईट फंगस- यशोमती ठाकूर

इयरबर्ड्स घालून गाणी ऐकताना अचानक झाला स्फोट, तरुणाचा मृत्यू

ड्रायव्हिंग लायसन्स सेंटर चालवणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी!

“कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लसीचे संमिश्र डोस सुरक्षित”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More