बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आमदारकी गेली तरी चालेल पण…’; निलंबित आमदार आमदार राम सातपुतेंचा सरकारवर घणाघात

मुंबई | विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी ठरला. पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान पाहायला मिळत आहे. भाजपच्या आमदारांनी गोंधळा घातला म्हणून त्यांच्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. अशातच निलंबित करण्यात आलेले भाजपचे आमदार राम सातपुते यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

आमदारकी गेली तरी चालेलपण जनतेच्या प्रश्नांसाठी लढतच राहणार. बारा आमदारांचं निलंबन म्हणजे ठाकरे सरकारची हिटलरशाही असल्याचं राम सातपुते यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच आम्ही शिवीगाळ केलेली नसून एक कथा रचून आमच्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलेलं असल्याचं राम सातपुते म्हणाले. त्यासोबतच आशिष शेलार यांनीही सरकारवर टीका केली आहे.

तालिबानी संस्कृतीला लाजवेल असं ठाकरे सरकार वागत आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या रुपाने नवे तालिबानी महाराष्ट्रावर राज्य करू पाहत आहे. भाजपच्या कोणत्याही आमदाराने भास्कर जाधवांना शिवीगाळ केली नसल्याचं शेलार म्हणाले. फडणवीसांनीही धक्का-बुक्की केल्याचं फेटाळून लावलं.

दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर आम्ही सरकारला उघडं पाडलं. एकाही भाजपच्या सदस्यानं शिवी दिली नाही शिवी देणारे कोण होते हे सगळ्यांनी पाहिलंय ते शिवसेनेचे सदस्य होते त्यांनीच धक्काबुक्की केल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईनंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले…

ह्रदयद्रावक! तीन वर्षाच्या चिमुकल्याच्या अंगावर कोसळली क्राँक्रीट लिफ्ट, जागीच मृत्यू

नियतीचा खेळ! सासऱ्याचा मृतदेह नेत होता जावई अन्…, एकाच दिवशी माय-लेकी झाल्या विधवा

“विधानसभेच्या काही सदस्यांनी मला आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या”- भास्कर जाधव

सगळे मरणार, फक्त राजकारणी जिवंत राहणार – प्रविण तरडे

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More