मुंबई | मराठा आरक्षणासाठी पुकारलेला मुंबई बंद स्थगित करण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे.
सरकारमुळे आमच्या हातात दगड काठ्या आल्या. यामुळे कोणाला त्रास झाला असेल तर मी माफी मागतो, पण सरकारने याची दखल घ्यायला हवी, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, सरकारने आमची पिळवणूक केल्यामुळे आम्हाला मूक मोर्चा एेवजी ठोक मोर्चे काढायला लागले. तसंच हा मोर्चा मराठा समाजाचा अपमान आणि अन्यायाविरूद्ध होता असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या–
-भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरु!
-मराठा क्रांती मोर्चाच्या ‘मुंबई बंद’वर दिग्दर्शक केदार शिंदेंचा संताप
-काकासाहेब शिंदेच्या मृत्यूनं मन विषण्ण; पंकजा मुंडे वाढदिवस साजरा करणार नाहीत!
-हार्दिक पटेलला मोठा झटका, 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
-मुंबई पुणे महामार्गावर दगडफेक; पोलिसांचा हवेत गोळीबार