बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“12 आमदारांचं निलंबन हा लोकशाहीचा खून”

मुंबई | विधिमंडळाच्या यावर्षीच्या पावसाळी अधिवेशनला कालपासून सुरूवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहामध्ये धक्काबुक्कीचा प्रकार घडला. त्याप्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्याचा निर्णय तालीका अध्यक्षांनी घेतला आहे. यावरून राज्यामध्ये विरोधी आणि सत्ताधारी पक्षनेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची खेळू रंगली असून, भाजप खूपच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

अशातच भाजप नेते प्रसाद लाड यांनी या मुद्यावर भाष्य केलं आहे. आज मुंबईमध्ये त्यांनी प्रसार माध्यामांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपची आजची भूमिका काय असेल, असा सवाल विचारण्यात आला. त्यावर काल 12 आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं. हे कृत्य पूर्णपणे लोकशाहीचा आणि त्याचबरोबर संविधानाचा खून करणारं असल्याचं प्रसाद लाड यांनी म्हटलं.

तसेच लोकशाही मार्गाने जे काही आम्हाला करता येईल ते आम्ही करू. त्याचबरोबर काल आमचे 12 आमदार सन्माननीन राज्यापालांना भेटले असल्याचं लाड यांनी सांगितलं. यावर लोकशाहीच्या मार्गातून अजून काही करता येतंय का, यासाठी देवेंद्र फडणवीस यावर चर्चा करणार आहेत. त्याचप्रमाणे केलेली निलंबना ही अत्यंत चुकीची आहे. कारण सभागृहाच्या बाहेर केलेल्या कृत्याच्या माध्यमातून तुम्ही निलंबन करू शकत नाही. असं ठरवून केलेलं, लोकशाहीचा खून करणाऱ्या कृत्याविरोधात आम्ही निश्चितपणे दाद मागणार असल्याचं प्रसाद लाड यांनी सांगितलं.

झालेल्या निलंबनाविरोधी दाद मागण्यासाठी भाजप कोर्टात जाणार का?, असं विचारण्यात आलं. यावर बोलताना याविषयी अद्याप काही निश्चित नसून, याबाबतही देवेंद्र फडणवीसांची बोलून निर्णय घेण्यात येणार असल्याचंही प्रसाद लाड यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

विधानमंडळ परिसरात भाजपची ‘प्रतिविधानसभा’; कालिदास कोळंबकर प्रतिविधानसभेचे अध्यक्ष

“अजित पवार ही वेळ भुलथापांची व राजकारण करण्याची नाहीये, जरा तरी माणुसकीचे भान ठेवा”

“ठाकरे सरकारचा हा बालिशपणा; लढायचं असेल तर मैदानात लढा”

सकारात्मक बातमी! देशातील कोरोना रुग्णसंख्येची 111 दिवसांतील निच्चांकी नोंद

युनियनच्या गुंडगिरीला ‘राम कदम’ जबाबदार; राजू सापते आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचा धक्कादायक आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More