बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एसटी महामंडळाचा आक्रमक पवित्रा, तब्बल एवढ्या कर्मचाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता

मुंबई | राज्यात मागील अनेक दिवस एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. एसटी विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी अडून बसलेले आहेत. मात्र, राज्य सरकारने विलीनीकरण लगेच शक्य नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरुच ठेवला आहे. त्यानंतर आता राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला असून राज्य सरकारने  तब्बल 297 कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं आहे.

राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला होता. त्यानुसार राज्य सरकारने 297 कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. तर रोजंदारीवर असणाऱ्या 238 कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे. अनेक प्रयत्न करूनही एसटी कर्मचारी संप मागे घेत नसल्याने राज्य सरकारने आता आक्रमक पवित्रा घेत निलंबन करण्यास सुरुवात केली आहे.

आधीच कोरोनामुळे एसटी महामंडळ तोट्यात गेलं आहे. त्यातच एसटी कर्मचाऱ्यांनी मागील 3 आठवडे एसटी पूर्णपणे बंद ठेवल्याने एसटी महामंडळाचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यातच राज्यातील प्रवाशांनाही प्रवासासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, यासाठी सर्व प्रयत्न केले होते. मात्र, तरीही एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरुच ठेवला आहे.

त्यातच निलंबनाच्या भीतीने दोन दिवसांपूर्वीच एका एसटी कर्मचाऱ्याने विष प्राशन करत आत्महत्या केली होती. त्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला होता. तरीही राज्य सरकारने निलंबनाची कारवाई सुरुच ठेवली असल्याने आता सरकारच्या अडचणी वाढू शकतात. राज्य सरकारने केलेल्या या कारवाईनंतर एसटी कर्मचारी यानंतर काय भूमिका घेतील? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

चित्रा वाघ यांच्या आमदारकीच्या चर्चांना पूर्णविराम; भाजपकडून ‘या’ उमेदवाराला संधी

महाराष्ट्रातील कोरोना रूग्णसंख्येत मोठी घट, वाचा आकडेवारी एका क्लिकवर

आदित्य ठाकरेंसाठी वरळीची जागा सोडणाऱ्या उमेदवाराला शिवसेना देणार मोठं गिफ्ट?

अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्यावर लाईक्सचा वर्षाव! ‘या’ हिट गाण्याचा केला रिमेक

“पण हे कृषी कायदे मागे घेतल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More