Top News देश

राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई

नवी दिल्ली | राज्यसभेत कृषी विधेयके मांडली जात असताना करण्यात आलेल्या गोंधळामुळे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी संबंधित खासदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांना निलंबन करण्यात आलं आहे. विरोधी पक्षांतील आठ खासदारांना संसदेच्या उर्वरित अधिवेशनापर्यंत निलंबित करण्यात आलं आहे.

खासदार डेरेक ओ’ ब्रिएन, संजय सिंह, रिपुन बोरा, नजीर हुसैन, केके रागेश, ए करीम, राजीव सातव आणि डोला सेन या खासदारांवर कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, कृषी विधेयके सभागृहात मांडण्यात आली. यावेळी तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ’ ब्रिएन, काँग्रेसचे खासदार रिपूण बोरा, आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह आणि द्रमुकचे खासदार तिरुची सिवा हे उपसभापती हरिवंश यांचा माईक हिसकावून घेण्याचा प्रयत्न करताना दिसले. अनेक खासदारांनी हरिवंश यांच्याविरोधात घोषणाही दिल्या.

महत्वाच्या बातम्या-

“जो शेतकरी जमिनीतून सोनं उगवतो, त्याच्या डोळ्यात मोदी सरकार रक्ताचे अश्रू आणतंय”

“कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येत भारत जगात अव्वल”

भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली; अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीत

कोरोनाच्या लढाईत पोलीस थकलेत, पण हिंमत हरलेले नाहीत- अनिल देशमुख

उत्तर प्रदेश सरकार उभारणार सर्वात मोठी फिल्मसिटी; योगी आदित्यनाथ यांनी केली घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या