कृषिमंत्री कोकाटेंचं मंत्रीपद झालं सुरक्षित, ‘त्या’ प्रकरणी कोर्टाचा मोठा दिलासा

Suspension of sentence of Manikrao Kokate

Manikrao Kokate | बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका लाटल्याप्रकरणी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. आज (५ मार्च) जिल्हा सत्र न्यायालयात त्यांच्या शिक्षेच्या स्थगिती अर्जावर सुनावणी पार पडली. या प्रकरणात अंतिम निकाल काय लागणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.  (Manikrao Kokate)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा

अखेर कोकाटे यांना कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. नाशिक सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे त्यांचं मंत्रीपद देखील आता सुरक्षित झालं आहे. या प्रकरणी विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता कोकाटे यांना या प्रकरणात दिलासा मिळाला आहे.

माणिकराव कोकाटे यांनी त्यांना झालेल्या शिक्षेला स्थगिती मिळावी (Stay of the Sentence) आणि शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती मिळावी (Suspension of Sentence) यासाठी दोन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केले होते. यावरच आज सुनावणी पार पडली.

नेमकं प्रकरण काय?

१९९५ मध्ये माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी आर्थिक दुर्बल घटकातील असल्याचे दाखवून मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छानिधीतून १०% आरक्षित सदनिका मिळवली. मात्र, त्यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे सदनिका मिळवल्याचे आरोप करण्यात आले.
माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याबाबत याचिका दाखल केली होती. त्यानंतर सरकारवाडा पोलिसांत ४२०, ४६५, ४७१ आणि ४७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर तब्बल ३० वर्षांनी म्हणजेच २० फेब्रुवारी २०२५ रोजी, कोकाटे बंधूंना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. तर, आजच्या सुनावणीत कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती मिळाली आहे.

Title :  Suspension of sentence of Manikrao Kokate

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .