नागपूर महाराष्ट्र

नक्षलवाद्यांचा हौदोस… पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून केली सामान्य नागरिकाची हत्या

गडचिरोली | भामरागड तालुक्यातील नारगुंडा येथील पाेलिस केंद्रांर्तगत येणाऱ्या मर्दहुर गावात पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी एका नागरिकाची हत्या केल्याची घटना घडली आहे. डोंगा कोमटी वेदडा असं या व्यक्तीचं नाव आहे.

डोंगा कोमटी वेदडा या नागरिकाची आज पहाटे  नक्षलवाद्यांनी झोपेतून उठवून आपल्या सोबत नेऊन हत्या केल्याची माहिती मिळत आहे.

डोंगा कोमटी वेदडा हा नागरिक पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून हत्या केली असल्याची प्रथामिक माहिती आहे.

दरम्यान, कुरखेडा येथील जांभूळखेडा येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यानंतर, नक्षलवादी बॅनर आढळून आले आणि त्यानंतर आज हत्येची ही तिसरी घटना घडली आहे.

महत्वाच्या बातम्या

-मत द्यायचंय ‘कमळाला’, द्यायला लावलं ‘पंजा’ला; व्हीडिओ शेअर करत स्मृती इराणींचा आरोप

-देशासमोरचे महत्वाचे मुद्दे कोणते??? रायबरेलीच्या महिला म्हणतात…

-‘त्या’ वक्तव्याप्रकरणी मोदीजी देश तुम्हाला कधीही माफ करणार नाही- राज ठाकरे

-आता जे मला ट्रोल करत आहेत, तेच माझं काम पाहून कौतुक करतील- रोहित पवार

-पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये तुफान राडा; मतदान केंद्राबाहेरच मारामारी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या