Top News मनोरंजन

धक्कादायक! ‘द डर्टी पिक्चर’ मधील अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू

कोलकाता | ‘द डर्टी पिक्चर’ या सिनेमातील अभिनेत्रीचा मृत्यू झाला आहे. अभिनेत्री देवदत्त बॅनर्जी ऊर्फ आर्या हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. कोलकातामधील जोधपूरमध्ये तिच्या राहत्या घरी तिचा मृतदेह आढळून आलाय.

सतत दार वाजवून देखील दार उघडत नसल्याने घरकाम करणाऱ्या व्यक्तीने शेजारी राहणाऱ्यांना कल्पना दिली. यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दार उघडल्यावर देवदत्तचा मृतदेह जमिनिवर पडला असल्याचं आढळून आलं.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, देवदत्तच्या नाकावर रक्ताचे डाग आढळून आले. मात्र तिच्या शरीरावर कुठेही दुखापत झाल्याचं दिसलं नाही. तिला रूग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलंय.

दरम्यान तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्याता आलाय. त्यानंतर तिच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होणार असल्याचं, पोलिसांनी सांगितलंय.

थोडक्यात बातम्या-

पंकजा मुंडेंनी घटवलं तब्बल 14 किलो वजन; पाहा कसं आहे डेली रुटीन!

‘नव्या कृषी कायद्यांचा उद्योगपतींनाच जास्त फायदा’; जागतिक बँकेच्या माजी अर्थतज्ज्ञांचं मत

गिनीज बुकमध्ये नाव असलेल्या मुंबईच्या तरूण व्यावसायिकाची आत्महत्या!

“रात्री 8 वाजता यायचं, काहीही बोलायचं आणि निघून जायचं, असं काम आम्ही करत नाही”

शेतकरी आंदोलन सुरुच रहावं अशी काहींची इच्छा- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या