बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ममता बॅनर्जींच्या भाचाच्या कानशिलात लगावणाऱ्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू, हत्या झाल्याचा आरोप

कोलकत्ता | एका कार्यक्रमादरम्यान 2015 साली एका व्यक्तीनं ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या कानशिलात लगावली होती. तृणमूल काँग्रेसचे महासचिव आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या कानशिलात लगावणाऱ्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

अभिषेक बॅनर्जी यांच्या कानशिलेत लगावणाऱ्या देवाशीष आचार्य यानं रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. काही अज्ञात लोकांनी गंभीर अवस्थेत असलेल्या देवाशीषला रुग्णालयात दाखल केले होते. देवाशीष याला मिदनापूर येथील तोमलुक जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही तासांतच त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून कुटुंबीयांनी देवाशीष याची हत्या झाली असल्याचा आरोप केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 जून रोजी मृत देवाशीष आचार्य आपल्या दोन मित्रांसोबत दुचाकीवर बाहेर गेले होते. दरम्यान सोनापेट्या टोल प्लाझानजीक असणाऱ्या एका चहाच्या दुकानाजवळ सर्वजण थांबले. याठिकाणी चहा पिल्यानंतर देवाशीष अचानक निघून गेले. यानंतर ते थेट दुसऱ्या दिवशीच गंभीर अवस्थेत सापडले आहेत. काहीजणांनी त्यांना मिदनापुरातील तमलुक जिल्हा रुग्णालयात दाखल केलं.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी देवाशीषच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला असून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. देवाशीषनं 2020 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.

थोडक्यात बातम्या – 

जितेंद्र आव्हाडांच्या खोचक शुभेच्छांना अण्णा हजारेंचं रोखठोक उत्तर; म्हणाले….

‘…तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही’; पंकजा मुंडेंचा ठाकरे सरकारला इशारा

ओबीसी आरक्षणासाठी येत्या 26 जून रोजी राज्यात चक्काजाम आंदोलन- पंकजा मुंडे

‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद यांचा आत्महत्येचा प्रयत्न

‘…अन्यथा रस्त्यावर उतरू’; विनायक मेटेंचा सरकारला इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More