आरोग्य

सुवर्णबिंदू प्राशन – निरोगी, सुदृढ, दीर्घायुषी आणि बुद्धीमान संततीसाठी…

हजारो वर्षांपासून आपल्या पूर्वजांनी आयुर्वेद जतन केला आणि आपल्या हातात आणून ठेवला. परदेशी उपचारांच्या आहारी पडलेल्या आपल्याला गेल्या काही वर्षांपासून आयुर्वेदाची महती कळायला लागली आहे. आज अनेक लोक आयुर्वेदिक उपचार पद्धतींकडे वळत आहे. याच आयुर्वेदात निरोगी, सुदृढ, दीर्घायुषी आणि बुद्धीमान संततीसाठी सुवर्णप्राशन सांगितलं आहे. नवजात बालकापासून १६ वर्षांपर्यंतच्या मुलांना आपण सुवर्ण प्राशन देऊ शकतो. आपल्या घरात किंवा नात्यात अशी मुलं असतील तर त्यांना ही माहिती नक्कीच उपयुक्त ठरु शकते.

सुवर्ण प्राशन म्हणजे नक्की काय?

सुवर्ण प्राशन हे लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढवून त्यांना सुदृढ करणारे आणि त्यांची बुद्धिमत्ता वाढवणारे-तेज करणारे एक आयुर्वेदिक लसीकरण आहे. सुवर्णप्राशन हे फ़ार पुर्वी पासून शक्तीवर्धक व बुद्धिवर्धक म्हणून लहान मुलांना दिले जाते. सुवर्णप्राशन हे मुलांच्या मेंदूवर, मनावर व तसेच रोगप्रतिकार प्रणालीवर (Immune system) कार्य करते. सुवर्णप्राशन मुलांच्या शारीरीक वाढीला प्रोत्साहन देऊन त्यांना निरोगी आरोग्य देते.

सुवर्णप्राशनाचे घटक-

सोन्याचे भस्म हे वचा आणि ब्राम्ही या प्रमुख घटकासह इतर औषधी वनस्पती द्रव्यांसोबत एकत्र करून मध आणि तूप यासमवेत एकजीव मिश्रण करून ’लेह’ (चाटण) स्वरूपाचे बनवले जाते.

सुवर्णप्राशन नेमकं कुणाकुणाला देऊ शकतो? :-

वर उल्लेख केल्याप्रमाणे नवजात बालकापासून ते 16 वयोवर्षाच्या मुलापर्यंत सर्वाना आपण सुवर्णप्राशन देऊ शकतो. त्याचा कोणताही साईड इफेक्ट नाही.

मुलांना सुवर्णप्राशन दिल्यास काय काय फायदे होऊ शकतात?-

सुवर्णप्राशनं हि ऐतत् मेधाग्निबलवर्धनम्।
आयुष्यं मंगलं पुण्यं वृष्यं वर्ण्यं ग्रहापहम्।।
(काश्यप संहिता)

1. मेंदूचा विकास – लहान मुलांचा मेंदूचा विकास त्यांना दिल्या जाणाऱ्या आहारावर आहे. त्यामध्ये जर सुवर्णप्राशन दिल्याने मेंदूचा विकास होण्यास मदत मिळते.

2. आकलन क्षमता सुधारते- लहान मुलांच्यामध्ये चंचलता खूप प्रमाणात असते, त्यामध्ये स्थिरता आणून आकलन (एखादी गोष्ट समजून घेण्याची क्षमता ) वाढण्यास सुवर्णप्राशन मुळे मदत होते.

3. पचन सुधारते- चमचमीत पदार्थ (वेफर्स, बिस्किटे, कॅडबरी) असे पदार्थ खाण्याचे प्रमाण लहान मुलांमध्ये जास्त असते. याचा परिणाम म्हणून लहान वयात येणारे लठ्ठपणा किंवा इतर आजारापासून बचाव करण्याचे काम घडून येते.

4. रोगप्रतिकारशक्ती वाढते- लहान मुलांच्यामध्ये आजारी पडण्याचे प्रमाण अधिक असते याचे प्रमुख कारण कमकुवत रोगप्रतिकारशक्ती हे असते. सुवर्णप्राशन रोगप्रतिकारशक्ती वाढवायला मदत करते.

5. वातावरणातील बादलांपासून बचाव- ऋतू बदलताना वातावरणात होणाऱ्या बदलामुळे लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण खूप आहे. सुवर्णप्राशन मुळे लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती सुधारल्याने बदललेल्या वातावरणाशी ते सहज जुळवून घेऊ शकतात.

6. घातक घटकांपासून बचाव- आताच्या काळात शेतामध्ये जो भाजीपाला पिकवला जातो तो पूर्णतः सेंद्रिय खते वापरून पिकवला जात नाही, त्यामुळे त्यास वापरल्या गेलेल्या रासायनिक खतांचा अवशेष त्यामध्ये असतो. असा भाजीपाला धुवून, शिजवून जरी खाल्ला तरी काही प्रमाणात रासायनिक घटक शरीरात जात असतात, त्यापासून बचाव होण्यास सुवर्णप्राशन मदत करते.

7. वर्ण सुधारतो- आता इथे वर्ण याचा अर्थ रंग असा न घेता त्यामुळे त्वचेवर तुकतुकीतपणा म्हणजे तजेलदारपणा निर्माण होतो.

अशाप्रकारे सुवर्ण प्राशन हे एकूणच शरीराची वाढ, मेंदूची वाढ, ऋतू बदलात होणाऱ्या आजारांपासून संरक्षण आणि शरीराचे बल वाढवण्याचे काम करते.

लेखिका- डॉ. अश्विनी पाटील (लेखिका आयुर्वेदात एमडी आहेत)

सुवर्णप्रशान देण्याचे ठिकाण-
श्री. सर्वज्ञ आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर
पत्ता- फ्लॅट नं. 9, कुदळे अपार्टमेंट, न्यू निखील सुपर मार्केटच्या वर,
रमेश डाईंगच्या शेजारी, माणिकबाग, सिंहगड रोड, पुणे

अधिक माहितीसाठी फोन करा-
फोन नं- 8275536054 / 8459940259

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या