सदाभाऊ खोत चौकशीला हजर राहा, स्वाभिमानीची नोटीस

मुंबई | स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चौकशी समितीने कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना नोटीस पाठवलीय. ४ जुलैला पुण्यातील शासकीय विश्रामगृहात चौकशीला हजर राहण्याचे आदेश या नोटीसीद्वारे देण्यात आलेत. 

सदाभाऊ खोत यांच्या वर्तनावर संघटनेतील अनेकांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे या ४ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आलीय. हीच समिती सदाभाऊंच्या भवितव्याचा फैसला घेणार आहे.

दरम्यान, आपल्यावर व्यक्तीद्वेषातून चौकशी सुरु असल्याचं कालच सदाभाऊ म्हणाले होते. 

1 Comment

  1. सदा भाउ आता शेतकरी नेते आता राहीले नाही ते आता बि जे पी वासी झालेत त्यांना आता संघटनेतुन काढल तरी काही फरक पडणार नाही

Comments are closed.