स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून सदाभाऊंची हकालपट्टी निश्चित?

पुणे | स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चौकशी समितीने सदाभाऊ खोत यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

प्रथम तुम्ही निर्णय घ्या, नंतर मी माझी भूमिका जाहीर करेन, असा पवित्रा सदाभाऊंनी घेतलाय. ही भूमिका आम्हाला पटली नसून येत्या चार दिवसात याबाबतचा अहवाल पक्षनेतृत्वाला देऊ, असं चौकशी समितीनं सांगितलं.

दरम्यान, सदाभाऊंनी पक्षनेतृत्वावर निर्णय सोपवला आहे. तसेच ऑगस्टपासून राज्यव्यापी दौरा करुन नव्या संघटनेची स्थापना करण्याचे संकेत दिले आहेत. त्यासाठी कार्यकर्ते आग्रही असल्याचंही ते म्हणाले. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या