बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आधी आमच्या शेतातील वीज खांबाचं भाडं द्या अन् नंतरच वीज कनेक्शन कापा”

मुंबई | सध्या राज्यातील शेतकरी (Farmers) आपापल्या शेतातील पीकांना पाणी देण्यात व्यस्त आहेत. अशातच महावितरणकडून (MSEB) शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन (Cuting off electricity Connections) कापण्यात येत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. महावितरणच्या या कारभारावरून सध्या राज्यातील राजकीय वातवरण चांगलंच तापलेलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं (Swabhinami Shetkari Sanghatna) राज्याचे विज पुरवठा मंत्री नितीन राऊत यांना (Minister Nitin Raut) पत्र लिहित जाब विचारला आहे.

एकीकडे राज्यातील मोठमोठ्या औद्योगिक कंपन्या राजरोसपणे वीज चोरी करत आहेत. त्यावर चाप लावण्याऐवजी नेहमी वीजबिले (Electricty Bills) भरून रात्रपाळीत वीजपुरवठा असताना देखील कोणतीही तक्रार न करता शेती करणार्‍यांवर कारवाई केली जात असेल तर शेतकऱ्यांना देखील आता कायद्याचा मार्ग पत्करावा लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रवक्ते रणजित बागल (Ranjeet Bagal) यांनी दिला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानी संघनेनं अनेकदा आंदोलनं केली आहेत. शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून लढा उभारला जाईल, असंही बागल म्हणाले आहेत. महावितरणने आमचे शेतातील खांबांचे व डिपीचे भाडे अदा करून सहकार्य करावे मग आम्ही सुद्धा वीजबिले भरून नक्की सहकार्य करू. वेठीस धरल्यास राज्यातील शेतकर्‍यांच्या साथीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जशास तसं उत्तर दिले जाईल, असा निर्वाणीचा इशारा बागल यांनी सरकारला दिला आहे.

दरम्यान, सध्या राज्यात विविध भागात वीज कनेक्शनचा प्रश्न निर्माण झाला आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीवर विरोधक जोरदार टीका करत आहेत. परिणामी राज्य सरकार वीज कनेक्शनबाबत महावितरणच्या कारवाईला थांबवतं का?, हा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे.

 

 

थोडक्यात बातम्या 

‘Omicron’ फक्त नावाचा खेळ! मिळाला 900 टक्क्यांचा रिटर्न्स; वाचा नेमका प्रकार काय?

“भाजप आता राज्यात 1 नंबरचा पक्ष बनलाय”

‘2 नंबरी सरकारची 2 वर्ष…’, चित्रा वाघ यांची कवितेतून टीका

परमबीर सिंह आणि सचिन वाझेंच्या ‘त्या’ भेटीविरोधात गृहमंत्र्यांनी उचललं मोठं पाऊल

“मंत्र्यांच्या ड्रायव्हरला 40 हजार आणि एसटी कर्मचाऱ्याला 12 हजार पगार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More