बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोसह निकृष्ट फीड देणाऱ्या कंपनीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

सोलापूर | पोल्ट्री फार्म धारकांना निकृष्ट दर्जाचे फिल्ड दिल्याप्रकरणी रोहित पवारांचा बारामती अॅग्रो कंपनीसह झापा कंपनी विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एका पोल्ट्री चालक शेतकऱ्याने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या कंपन्यांविरोधात तक्रार केली होती. तसेच निकृष्ट दर्जाच्या फीडमुळे अचानक कोंबड्यांनी अंडी देणे बंद केल्याचंही म्हटलं होतं.

दरम्यान, या प्रकरणात कंपनीशी संपर्क केला असता कंपनीकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्यास ही शेतकऱ्यांनी सांगितलं. त्यानंतर या प्रकरणात आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उडी घेतली असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते रणजित बागल यांनी महाराष्ट्रातील मंत्री सुनील केदार यांना पत्र लिहून या कंपन्यांविरोधात कडक पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.

रोहित पवार यांची बारामती अॅग्रो या कंपनीकडून तसेच झापा या कंपनीकडून गेल्या अनेक वर्षांपासून पशुखाद्य शेतकरी खरेदी करतात. पण यापूर्वी कधीही असं निकृष्ट दर्जाचं फीड शेतकऱ्यांना मिळालं नाही. पण गेल्या महिन्यात या फीडमुळे मोठ्या प्रमाणात कोंबड्यांनी अंडी देणे बंद केल्याने लाखोंचे नुकसान झाले असल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई या कंपन्यांनी द्यावी, असे आदेश सरकारने काढावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

या प्रकरणात सरकार नेमके काय पावलं उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसेच रोहित पवारांच्या कंपनीचा यात समावेश असल्याने नेमकी कारवाई होणार का? असा प्रश्न जनमाणसातुन विचारला जात आहे.

थोडक्यात बातम्या –

‘एकत्र आलेल्या राजांचं स्वागत, पण त्यांचं बोलणं भाजपच्या मिठाला जागल्यासारखं; शिवसेनेचा खोचक टोला

कोरोना रुग्णांना आता ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या कोणता आहे हा आजार!

दिलासादायक! मुंबईतील कोरोना आटोक्यात; सक्रिय रूग्णांसह नव्या बाधितांच्या संख्येत घट

“हेल्थकार्ड सिस्टीम ही नव्या आरोग्य व्यवस्थेची सुरवात ठरेल” – डॉ. राजेंद्र विखे पाटील

कोरोनानं रोखली वारकऱ्यांची वाट, अशी असेल यंदाची वारी!

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More