बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा ‘हा’ मित्रपक्ष ठरणार डोकेदुखी?

पंढरपूर | पंढरपूरचे दिवंगत आमदार भारत भालके यांचं नुकतंच कोरोनामुळे निधन झालं. त्यानंतर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात  राष्ट्रवादी काँग्रेस ही जागा बिनविरोध जिंकेल अशी चिन्हे होती. पण आता मित्रपक्षच राष्ट्रवादीला या जागेसाठी आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. या रिक्त जागेवर स्वाभिमानी शेतकरी संघटना आपला उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची शक्यता आहे.

आघाडीचा मित्रपक्ष असलेला स्वाभिमानी शेतकरी संघटना पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. या जागेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनकडून सचिन पाटील यांचं नाव समोर येत आहे. यासाठी सचिन पाटील अर्ज भरणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. याबाबत कार्यकर्त्यांचा कौैल घेऊन येत्या दोन दिवसात निर्णय घेऊ, असं राजू शेट्टी म्हणाले.  भारतनाना भालकेंचे निधन हा आमच्यासाठी मोठा धक्का असून स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी विचार-विनिमय करुनच या पोटनिवडणुकीसाठी स्थानिक उमेदवार देण्यास प्राधान्य असणार आहे, असं अजित पवारांनी याआधी स्पष्ट केलं होतं.

दरम्यान, महाविकास आघाडीत आता बिघाडी होण्याची शक्यता आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना हळूहळू सरकार विरोधी पाऊलं उचलताना दिसत आहे. रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यात देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं निदर्शने केली होती.

थोडक्यात बातम्या-

एक रात्र माझ्यासोबत घालव!; अंकिता लोखंडेचा निर्मात्याबाबत धक्कादायक खुलासा

सचिन वाझेंची 200 पानी डायरी NIA च्या हाती; वाझेंची आर्थिक गुपितं होणार उघड?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा महाविद्यालयांना मोठा झटका!

लेकीने वडिलांना हॉटेलमध्ये दारु पाजली, जेवू घातलं अन् नंतर जाळून टाकलं; कारण ऐकून पोलिसही हादरले

महाराष्ट्रातील घडामोडींमुळे काँग्रेस नाहक बदनाम; हायकमांड घेणार निर्णय!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More