राष्ट्रवादी अजित पवार गटाला धक्का; अजितदादांच टेन्शन वाढलं

Sangli News l विधानसभा निवडणुकीचं वारं वेगानं वाहत आहे. कारण आता सर्वच उमेदवारांनी प्रचाराला सुरवात देखील केली आहे. मात्र आता सांगलीच्या राजकारणातून एक मोठी बातमी आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पाटील यांना राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं देखील पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे आता सांगलीतील राजकीय गणित बदललं आहे.

एवढंच नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रोहित पाटील यांचा प्रचार देखील करण्यात येणार आहे. रोहित पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सांगलीच्या तासगाव-कवठेमहांकाळ विधासभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी खासदार संजय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाला धक्का :

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, सांगलीच्या तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघामधील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रोहित आर आर पाटील यांना राजू शेट्टी यांनी पाठिंबा दिला आहे. कारण सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी हा पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच उमेदवार रोहित पाटील यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या सभेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पाठिंबा देत असल्याचं महेश खराडे यांनी देखील जाहीर केलं आहे.

याशिवाय तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आता उ\महाविकास आघाडीचे अधुकृत उमेदवार रोहित पवार यांचा प्रचार देखील करण्यात येणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या विधानसभा मतदारसंघात दोनही राष्ट्रवादीचेच उमेदवार आहेत. कारण राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रोहित पाटील तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडू संजय पाटील यांच्यामध्ये लढत होणार आहे.

Sangli News l संजय पाटील यांच्यासमोर मोठं आव्हान :

मात्र आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रोहित पाटील यांना पाठिंबा देण्यात आल्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकत वाढल्याची चर्चा रंगली आहे. तसेच दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रोहित पाटील यांना असलेला पाठिंबा हे संजय पाटील यांच्यासाठी देखील मोठं आव्हान ठरू शकतं असं बोललं जात आहे. तसेच या मतदारसंघातून तब्बल 23 उमेदवार विधानसभेच्या रिंगणात आहेत. मात्र त्यापैकी दहा उमेदवारांनी विविध पक्षांच्या वतीनं अर्ज देखील दाखल केला आहे तर तेरा उमेदवार हे अपक्ष निवडणूक लढवत असल्याचं दिसत आहे.

News Title – Swabhimani Shetkari Sanghatna support from Rohit Patil

महत्त्वाच्या बातम्या-

महविकास आघाडीची सत्ता आल्यास लाडक्या बहिणींना ‘इतके’ पैसे मिळणार!

राजकारण ‘या’ भाजीसारखं झालं आहे… बड्या नेत्यानी सर्वच पक्षांना घेरलं!

महायुती सरकारचं सुरक्षित पुण्यासाठी मोठं पाऊल, चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना यश

ईडीची मोठी कारवाई! ‘या’ सोसायटीची 333 कोटींची मालमत्ता जप्त

‘गरिबांना पक्क घर देणार’; अकोल्याच्या सभेत PM मोदींची घोषणा