बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

स्वाभिमानीचंही एकरकमी FRPसाठी डिजिटल आंदोलन, सहभागी होण्याचं आवाहन

मुंबई | नीती आयोगाच्या शिफारशीनूसार केंद्र सरकारकडून एफआरपी अर्थात ऊसदर हा तीन टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला जात आहे. यामुळे राज्यातील सर्वसामान्य शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काळात शेतकरीपुत्रांचे भविष्य देखील अंधकारमय होऊ नये म्हणून आता शेतकरी संघटनांनी एकरकमी एफआरपीसाठी डिजीटल आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

व्यापार धार्जिणे निर्णय घेणाऱ्या या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा प्रश्न विचारण्याची आता वेळ आली असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगितलं आहे. यासाठी स्वाभिमानीने मोठा लढा उभारला असून याआधीच 12 सप्टेंबरपासून मिस्डकॉल मोहिम देखील संघटनेकडून चालवली जात आहे. या मोहिमेस शेतकरी व राज्यातील शेतकऱ्यांची तरूण मुलं यांच्याकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगितलं आहे.

आता याच लढाईचा आणखी एक भाग म्हणून स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांच्या आदेशानुसार शनिवारी 25 सप्टेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतिने सायंकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘#एकरकमी_FRP’ या हॅशटॅगचा ट्रेंड घेतला जाणार आहे.. या मोहिमेत राज्यातील सर्व राजकीय तसेच बिगर राजकीय संघटना यांनी या हॅशटॅग मोहिमेत सहभागी व्हावं असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजित बागल यांनी केले आहे.

दरम्यान, स्वाभिमानी व इतर कृषीविषयक संघटनांकडून आयोजित या केलेल्या या ट्रेंडमध्ये राज्यातील शेतकरीपुत्रांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन फेसबुक, ट्विटर तसेच इतर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर #एकरकमी_FRP हा हॅशटॅग वापरून जास्तीत जास्त प्रमाणात आपली मते मांडावीत व या मोहिमेत सहभागी होत स्वाभिमानीच्या एकरकमी एफआरपीच्या तुकडीकरणाविरोधातील मोहिमेस बळ द्यावं असं देखील बागल यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“लोकं सांगतात…एका एकराला 18 कोटी मिळतायेत, दादा तो रस्ता आमच्या वावरातून न्या की”

“श्रीराम, श्रीकृष्ण आणि भगवान महादेव हे भारतीय मुसलमानांचे पूर्वज!”

“मनसेने कधीही सत्तेसाठी शिवसेनेसारखी लाचारी पत्करली नाही”

अॅम्ब्युलन्सच्या सायनरचा आवाज बदलणार, आता वाजणार ‘ही’ नवी धून

मोठी बातमी! ‘या’ तारखेपासून राज्यातील शाळा सुरु, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More