बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भारतीय नागरिक आरएसएसमुळेच सुरक्षित, त्यांच्यामुळे देशाला शांती लाभली”

नवी दिल्ली | भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या वादग्रस्त वक्तव्यांसाठी सोशल मीडियावर नेहमीवर चर्चेत असतात. त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळेच देश सुरक्षित असल्याचं त्यांनी मत व्यक्त केलं आहे. तसेच उपद्रव माजवणाऱ्या लोकांपासून आपल्याला आरएसएसमुळेच शांती मिळाली असल्याचा दावा देखील प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला आहे.

छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना मी सांगू इच्छिते की, त्यांनी त्यांच्या राज्यात वाकून पहावं. याठिकाणी मोठ्याप्रमाणात हिंदूचं धर्मांतर करून त्यांना ख्रिश्चन धर्मात प्रवेश दिला जात आहे. यासंदर्भात माझ्याकडे पुरावे देखील आहेत. तेथील जनता यामुळे खूपच त्रस्त झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर खूप मोठा अन्याय होत आहे, तरी ते शांत बसलेत. विश्वामधील बंधुत्वाची जी भावना सध्या जिवंत आहे, त्याचं सर्व श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जातंय. तसेच भारतीय नागरिक आरएसएसमुळेच सुरक्षित आहे. देशातील कुठल्याही उपद्रवी लोकांपासून जी आपल्याला शांती मिळतेय ती आरएसएसमुळेच मिळत आहे, असंही प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या.

आरएसएसमुळे काॅंग्रेसला देशातील नागरिकांचं पूर्ण मतांंतर करता येत नाही. आरएसएस दहशतवाद सारख्या गोष्टीवर अंकूश लावत आहे म्हणूनच तर ते सत्ता गाजवत आहे, असं नाही. आमची संघटना घराघरात, जनमाणसांमध्ये रूझलेली आहे. म्हणून ते या संघटनेला त्रासलेले आहेत, असंही प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी सांगितलं.

दरम्यान, अलिकडेच प्रज्ञा सिंह ठाकूर या महिलांसोबत कबड्डी खेळतानाचा व्हिडीओ समोर आला होता. त्या व्हिडीओवरून त्या सोशल मीडियावर चांगल्याचं ट्रोल झाल्या.  दहशतवादाचा आरोप असणाऱ्या प्रज्ञा सिंह ठाकूर काही दिवसांपूर्वी तब्येत बरी नसल्याने न्यायालयात येवू शकत नव्हत्या, मात्र आता त्या नाचत आहेत. हा एक चमत्कारचं आहे, असा टोला प्रसिद्ध पत्रकार आणि लेखिका स्वाती चतुर्वेदी यांनी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना लगावला होता.

थोडक्यात बातम्या-

‘…तर पुन्हा पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक करणार’; अमित शहांचा पाकिस्तानला इशारा

वाजपेयींचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत वरूण गांधींचा मोदी सरकारवर निशाणा; पाहा व्हिडीओ

“मी रांगत फिरेन, हवं तर लोळत फिरेन, हवं तर गडगडत जाईन, कोणाला काय प्राॅब्लेम?”

‘बास झालं राजकारण, हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावं…’; उदयनराजेंचं खुलं आव्हान

“चित्रा वाघ कोणत्या मनोवृत्तीच्या आहेत हे त्यांनी दाखवून दिलंय”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More