Swami Avimukteshwaranand Saraswati | अयोध्या येथे भव्य राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा अयोध्येत पार पडला. मात्र, याच प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यास तेव्हा अनेकांनी विरोधही केला होता. मंदिराचे अपूर्ण काम तसेच इतर काही कारणे देत याला विरोध करण्यात आला होता. यामध्ये उत्तराखंड ज्योतिष पीठचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा देखील समावेश होता.
आता हेच शंकराचार्य स्वामी (Swami Avimukteshwaranand Saraswati) आज 15 जुलैरोजी शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी खासदार संजय राऊत देखील उपस्थित राहणार असल्याचं म्हटलं जातंय. राम मंदिर पूर्ण झाले नसताना प्राणप्रतिष्ठा करण्यास शंकराचार्य अविमुक्तेश्वरनंद यांनी विरोध केला होता. त्यावेळी त्यांना उद्धव ठाकरे यांनी समर्थन दिले होते.
अशात शंकराचार्य स्वामी थेट उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याने राजकीय वर्तुळात सध्या याची जोरदार चर्चा आहे. त्यांच्या भेटीमागील कारण अद्याप समोर आलं नाहीये. मात्र, आता त्यांच्यात काय चर्चा होणार, याबाबत सर्वांचं लक्ष लागून आहे.
कोण आहेत स्वामी अविमुक्तेश्वरानंद?
अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा करण्यास विरोध करणाऱ्यांमध्ये स्वामी अविमुक्तेश्वरानंद देखील होते. तेव्हापासून ते प्रचलित झाले. मंदिराचे कळस पूर्ण झाले नसल्यामुळे शास्त्रांच्या दृष्टिने प्राणप्रतिष्ठा करणे चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी याला विरोध दर्शवला होता.
सप्टेंबर 2022 मध्ये शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती (Swami Avimukteshwaranand Saraswati) यांनी समाधी घेण्यापूर्वी उत्तराधिकारीची निवड केली होती. त्यांनी स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना ज्योतिष पीठ बद्रीनाथचे प्रमुख केले होते. त्यांचा जन्म हा 15 ऑगस्ट 1969 मध्ये प्रतापगडमधील ब्राह्मणपूर गावात झाला. त्यांचे खरे नाव उमाशंकर पांडे होते. त्यांनी सहावीपर्यंत गावात शिक्षण घेतले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते बाहेरगावी गेले.
उमाशंकर पांडे यांना एकदा त्यांच्या वडिलांनी गुजरातमध्ये नेले. त्या ठिकाणी काशीचे संत रामचैतन्य यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यानंतर त्यांनी उमाशंकर यांना संत रामचैतन्य यांच्याकडेच सोडून दिले. गुजरातमध्ये काही वर्ष अध्यपन केल्यानंतर ते वाराणसीत पोहचले. येथे त्यांची भेट स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्याशी झाली. 2000 मध्ये स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी त्यांना दीक्षा दिली आणि ते उमाशंकर पांडे ऐवजी स्वामी अविमुक्तेश्वरानंद बनले.
News Title- Swami Avimukteshwaranand Saraswati Will Meet Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या-
‘या’ 5 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, धनलाभाचे संकेत
मोठी बातमी! ‘त्या’ आरोपांनंतर छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला, राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंचं पंकजा मुंडेंबाबत मोठं वक्तव्य; थेट म्हणाले…
रोज सकाळी फक्त एक ग्लास Beetroot Juice पिण्याचे आहेत ‘इतके’ फायदे!
आरक्षणासंबंधी छगन भुजबळांच्या आरोपांवर सुप्रिया सुळेंचं जशास तसं प्रत्युत्तर; म्हणाल्या..